Goa Drug Case: अल्पवयीन मुलाकडून तब्बल ८ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त, कोकण रेल्वे पोलिसांची कारवाई

Goa Drug News: कोकण रेल्वे पोलिसांनी गुरूवारी (२० मार्च) मोठी कारवाई करत तब्बल ८.१८४ किलो गांजा जप्त केला आहे.

पणजी: कोकण रेल्वे पोलिसांनी गुरूवारी (२० मार्च) मोठी कारवाई करत तब्बल ८.१८४ किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आलं आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची एकूण किंमत ८.१८ लाख रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर ही कारवाई करण्यात आली. मुलगा या प्लॅटफॉर्मवर उभा होता. पोलिसांनी मुलाच्या संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून चौकशी केली असता गांजा आढळून आला. त्वरित कारवाई करत पोलिसांनी संबंधित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे.

चौकशीत मुलगा अल्पयवीन असल्याचं आढळून आल्यानं पोलिसांनी त्याला अपना घरात पाठवलं आहे. कोकण रेल्वे पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल गुडलर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विप्लव वस्त या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. गांजा कुठून आणला तो कुठे नेला जाणार होता, याचाही शोध घेतला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Jharkhand Native Arrested With Drugs In Goa
Konkan Railway Modernization Plan
 Madgaon Railway Station
Konkan Railway Action On Unauthorized Vendor
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com