Goa Police X- Social Media
गोवा

इफ्फी आणि संत फ्रान्सिस झेवियर एक्सपोझिशन! दोन मोठ्या महोत्सवांच्या सुरक्षेची व्यवस्था गोवा पोलिस कसं करतंय?

Goa Police: कलाकार, पर्यटक आणि सिनेरसिकांच्या सुरक्षेची जबाबदारी गोवा पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांवर असणार आहे.

Pramod Yadav

IFFI Goa 2024 And Saint Francis Xavier Exposition

पणजी: दिवाळीसह गोव्यात विविध महोत्सवांच्या पर्वाचा देखील शुभारंभ होत आहे. यावेळी गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासोबत संत फ्रान्सिस झेवियर यांचे एक्सपोझिशन देखील होणार आहे.

दरवर्षी प्रमाणे २० ते २८ नोव्हेंबर या काळात इफ्फी पार पडेल तर, अवशेष दर्शन सोहळा ४५ दिवसीय महोत्सवाला २१ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. राज्यात होणाऱ्या या दोन मोठ्या महोत्सवाच्या सुरक्षेची जबाबदारी गोवा पोलिस आणि केंद्रीय सुरक्षा बलावर असणार आहे.

राज्यात होऊ घातलेल्या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोवा पोलिस आणि एनएसजी जवानांनी काही दिवसांपूर्वी संयुक्त मॉकड्रीलमध्ये सहभाग घेतला. पोलिस आणि जवानांनी संभाव्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेतला. किनारपट्टी भागात गस्त घालण्यासाठी पोलिसांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. तसेच, रात्रीचे गस्त प्रमाण देखील वाढवले आहे. भारतीय राखीव दलातील पोलिस देखील ठिकठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.

 पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिरेकी विरोधी पथक (एटीएस), अमली पदार्थ विरोधी पथक (एएनसी) आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांना राज्यातील गैरप्रकारांवर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. कळंगुटसारख्या किनाऱ्या भागात पोलिसांनी दलालांवर कारवाईचे सत्र सुरु केले आहे. कळंगुट पोलिसांनी गेल्या काही दिवसांत या किनारी भागातून शेकडो दलालांना अटक केलीय.

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त हजारो देशी विदेशी सिने कलाकार गोव्यात हजेरी लावतील. यासह लाखो सिने रसिक देखील गोव्यात उपस्थित राहणार आहेत. या कलाकार, पर्यटक आणि सिनेरसिकांच्या सुरक्षेची जबाबदारी गोवा पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांवर असणार आहे.

इफ्फीसह याचवेळी गोव्यात (ओल्ड गोवा) होत असलेल्या संत फ्रान्सिस झेवियर अवशेष दर्शन सोळ्यासाठी पोलिस महानिरीक्षक, पोलिस महासंचालक यांच्या नेतृत्वाखील गोवा पोलिस आवश्यक सर्व उपाययोजना करत आहे. अतिरेकी विरोधी पथकाकडून देखील आवश्यक काळजी घेतली जात आहे.

प्रदर्शनस्थळी फायर सेफ्टी सुनिश्चित करण्यासाठी फेस्तच्या ठिकाणी स्टॉलची संख्या मर्यादीत ठेवण्यात आली आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी उपस्थित राहतील अशी व्यवस्था करण्यात आलीय. आपत्कालिन परिस्थितीत वाहन सहज बाहेर पडावे यासाठी देखील योग्य काळजी घेण्यात आली आहे.

पोलिसांसाठी तारेवरची कसरत

राज्यात दोन मोठे महोत्सव होत असल्याने बंदोबस्त आणि सुरक्षेची जबाबदारी पोलिसांवर आहे. पण, याचवेळी राज्यातील गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान देखील पोलिसांवर असणार आहे.

वाढत्या चोरीच्या घटना लक्षात घेता महोत्सवाच्या काळात त्यावर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान असेल. राज्यातील दोन (दाबोळी आणि मोपा) विमानतळावर येणाऱ्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी काही दिवसांपूर्वी मिळाली होती. अशा धमक्यांचा सोक्षमोक्ष लावण्याची जबाबदारी देखील पोलिसांवर आहे. थोडक्यात गोवा पोलिसांची महोत्सवाचा बंदोबस्त, सुरक्षा आणि राज्यातील कायदा व्यवस्था राखता दमछाक होणार एवढे नक्की.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'मी चाललोय, काहीतरी रंजक घडेल!',आरजीच्या पाठोपाठ पालेकरांची दिल्लीवारी; Watch Video

अग्रलेख: '...आंबेडकरांच्या 'संघराज्या'च्या व्याख्येने गोव्याला दिली वेगळी ओळख!

Goa Politics: 'पक्षात यायचं तर दरवाजे उघडे आहेत', भाजप प्रदेशाध्यक्षांनी उडवली खिल्ली; काँग्रेसच्या रणनीतीला दिलं झणझणीत उत्तर

IND vs SA: कसोटी मालिकेत टीम इंडियाचा सूपडा साफ! व्हाईटवॉशनंतर गौतम गंभीरला म्हणाला, 'पराभवाची जबाबदारी सगळ्यांची...'

WTC Points Table: भारताच्या 'क्लिन स्वीप'चा पाकिस्तानला फायदा, WTC पॉइंट टेबलमध्ये उलटफेर; दक्षिण आफ्रिकेने मारली बाजी

SCROLL FOR NEXT