पूजा नाईक कॅश फॉर जॉब प्रकरण! दोन सरकारी अधिकारी रडारवर; CM प्रमोद सावंत

Cash for Job Scam: पूजा नाईकने तब्बल ८ ते १० वेळा विदेश दौरे केले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.
पूजा नाईक कॅश फॉर जॉब प्रकरण! दोन सरकारी अधिकारी रडारवर; CM प्रमोद सावंत
Goa CM Pramod SawantDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Cash for Job Scam Goa

पणजी: पैशांच्या बदल्यात सरकारी नोकरीचे आमिष देऊन अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या पूजा नाईक प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात आता दोन सरकारी अधिकारी रडारवर असल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. या प्रकरणात सचिवालयातील दोन अधिकाऱ्यांची चौकशी होणार असल्याचे सावंत म्हणाले.

सरकारी नोकरीचे आमिष देऊन नागरिकांकडून भरमसाठ पैसे उकळणारी पूजा नाईक अखेर गजाआड गेलीय. पण. या प्रकरणात गुंतलेल्या अनेकांची नावे हळूहळू समोर येऊ लागली आहेत. याप्रकरणी आत्तापर्यंत नऊ जणांना अटक केली असून, यातील दोन सरकारी अधिकारी आहेत.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याची दखल घेतली असून, सचिवालयातील दोन अधिकाऱ्यांची चौकशी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पूजा नाईकच्या नावावर तीन ते चार अलिशान गाड्या, फ्लॅट असल्याची माहिती आहे. तर, तिने तब्बल ८ ते १० वेळा विदेश दौरे केले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.

पूजा नाईक कॅश फॉर जॉब प्रकरण! दोन सरकारी अधिकारी रडारवर; CM प्रमोद सावंत
Belagavi Goa Flight: खूशखबर! बेळगावातून आता गोव्यासाठी दररोज फ्लाईट; कधी सुरु होणार सेवा? जाणून घ्या

पूजा नाईक प्रकरणामुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे. त्यात या सरकारी अधिकाऱ्यांचा सहभाग स्पष्ट झाल्याने भ्रष्टाचाराचे जाळे किती मोठे असणार याबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत.

एक महिला गेल्या दहा वर्षापासून लोकांना फसवणुकीचे काम करतेय. ही महिला माझ्याकडे आली त्यावेळीच तिची भांडे फोड झाली होती. अशाप्रकारच्या महिलांपासून सावध राहण्याचे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Assembly Election 2027
Goa Surla Farmers Compensation
Goa Olympians Development
Pramod Sawant Cabinet Meeting
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com