Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: पणजी आणि बार्देशमधून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण; परप्रांतीय आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल

Panjim Girl Child Abduction: पणजी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असतंच पर्वरीमधून देखील असेच एक प्रकरण उघडकीस आले

Akshata Chhatre

पणजी: गुन्हेगारी नेमक्या कोणत्या प्रकारे घडेल हे सांगता येत नाही आणि नेमका गुन्हेगार कोण असेल हे देखील ओळखणं कठीण आहे. पणजी पोलिसांनी भाटलें येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्या प्रकरणी ओडिशातील रहिवाशाला अटक केली आहे. पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीनुसार कामू जाना नावाच्या आरोपीने तिच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला एका अज्ञात स्थळी नेऊन ठेवले.

पीडित मुलीच्या आईने नोंदवलेल्या तक्रारीच्या आधारे पणजी पोलिसांना संशयित आरोपीच्या विरोधात बीएनएस कायद्याच्या कलम 137(2) आणि गोवा बाल अधिनियमाच्या कलम 8 नुसार गुन्हा दाखल केला आहे आणि या प्रकरणाचा पुढील तपास पणजी पोलीस ठाण्याच्या पीएसआय रश्मिका कवळेकर करत आहेत.

पर्वरीमधून अल्पवयीन मुलीचे अपहरण

पणजी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असतंच पर्वरीमधून देखील असेच एक प्रकरण उघडकीस आले आहे. बार्देश येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली आहे.

पीडित मुलीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार जुलै 2024 मध्ये तिच्या 16 वर्षीय मुलीचे अपहरण झाले होते. बीएनएस 2023 च्या कलम 137 आणि गोवा बाल अधिनियमाच्या कलम 8 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या पीडित मुलीला कोंकणी,हिंदी आणि मराठी अशा भाषा बोलता येतात.

हे दोन्ही प्रकार अल्पवयीन मुली कायदेशीर पालकत्वात असताना घडले आहेत. कायदेशीर पालकत्व म्हणजे जिथे पालकांच्या अनुपस्थितीत मुलांची जबाबदारी घेण्यासाठी काही खास माणसांची नियुक्ती केली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT