गोव्यात पर्यटन (Goa Tourism) हंगामाला सुरूवात झाली आहे. यासह आता अवैध धंद्यांना देखील पेव फुटले आहे. अवैध धंद्यांना आवर घालणे हे मोठे आव्हान गोवा पोलिसांसमोर (Goa Police) असणार आहे. दवर्ली दिकरपाल पंचायतीच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध कॅसिनोवर (Illegal Casino) पोलिसांनी छापा टाकला. छापा टाकण्यापूर्वीच आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.
मिळालेल्या माहितीनुसार, दवर्ली दिकरपाल पंचायतीच्या (Davorlim Dicarpal Panchayat) हद्दीत अवैध कॅसिनो चालवला जात होता. मायना कुडतरी पोलिसांना (Maina Curtalim Police) याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी याठिकाणी छापा टाकला. दरम्यान, छापा पडण्यापूर्वी आरोपींनी याठिकाणावरून पळ काढला. पोलिसांनी या ठिकाणावरून आठ संगणक (Computer) जप्त केले आहेत. मायना कुडतरी पोलिस अधिक तपास करत आहेत.
मेक माय ट्रीपसह तीन ऑनलाईन ट्रॅव्हल कंपन्यांना नोटीस
नियमांचे पालन न केल्यामुळे मेक माय ट्रीपसह तीन ऑनलाईन ट्रॅव्हल कंपन्यांना पर्यटन खात्याने नोटीस बजावली आहे. यामध्ये 'मेक माय ट्रीप', 'लोहोना डॉट कॉम', 'गोवा व्हिलाज फॉर रेंट फॉर डॉट कॉम' या तीन कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांची पर्यटन खात्याकडे नोंदणी नसल्याचे पर्यटन खात्याने म्हटले आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेटर युवराज सिंगला (Indian Cricketer Yuvraj Singh) देखील याच कारणासाठी नोटीस बजावण्यात आली होती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.