Goa Police : अमली पदार्थ प्रकरणात दोघांच्या मुसक्या आवळल्या; हरमल, म्हापसा येथे केली कारवाई

दोन वेगवेगळ्या कारवाईत दोघांना अटक
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak

गोव्यात अमली पदार्थ प्रकरणात अनेकांची धरपकड सुरु आहे. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी देखील पर्यटनाचा दर्जा उंचावण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशिल असल्याचे म्हटले आहे. असे असले तरी, गोव्यातील गैरप्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीत. या पार्श्वभूमीवर आज हरमल, म्हापसा येथे केली कारवाई करण्यात आली असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

Goa Crime
Goa Flight : गोव्याला परतणाऱ्या विमानाचे मुंबईत इमर्जन्सी लँडिंग; सर्व प्रवासी सुखरुप

मिळालेल्या माहितीनुसार पेडणे पोलिसांना एक व्यक्ती अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा लावत हरमल येथे एकाला अटक केली आहे. चंकी खत्री (27) असे संशयिताचे नाव असून त्याच्याकडून 305 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. याची किंमत 40,000 रु असल्याची माहिती समोर आली आहे.

Goa Crime
Goa Tourism : गोव्यातील पर्यटनासाठी बुकिंग घेणाऱ्या तीन वेबसाइटना नोटीस; पर्यटन खाते अ‍ॅक्शन मोडमध्ये

अशाच प्रकारची कारवाई म्हापसा बस स्थानक येथे पोलिसांनी केली असून या कारवाईत म्हापसा पोलिसांनी 90000 ग्रॅम गांजा बेकायदेशीरपणे बाळगल्याबद्दल बिहारमधील दिलशाद शेख (23) याला अटक केली आहे. पोलिसांना याबाबत आणखी काही संशयितांच्या अटकेची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच प्रकरणाचा तपास अद्याप सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com