Goa police raids Domnic D’Souza's home Dainik Gomantak
गोवा

डॉम्निकच्या घराची पोलिसांकडून झाडाझडती

साहित्य जप्त : म्हापसा कोर्टाकडून जामीन मंजूर

दैनिक गोमन्तक

शिवोली/म्हापसा : सडये-शिवोली येथील ‘फाईव्ह पिलर्स’ या बिलिव्हर पंथाचा धर्मगुरू पास्टर डॉम्निक डिसोझा ई मास्कारेन्हस याला धर्मांतरण प्रकरणात म्हापसा पोलिसांनी अटक केली होती. शुक्रवारी सायंकाळी संशयित डॉम्निकला म्हापसा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. (Goa police raids Domnic D’Souza's home)

तत्पूर्वी सकाळी त्याच्या घरावर छापा टाकून झडती घेतल्याचे पोलिस निरीक्षक परेश नाईक यांनी सांगितले. पोलिसांनी काही धार्मिक पुस्तके तसेच अन्य साहित्य जप्त केले.

डॉम्निक गेली अनेक वर्षे सडये येथे प्रार्थना सभांचे आयोजन करत होता. त्याच्या प्रार्थना सभांना हजारोंच्या संख्येने विविध धर्मांचे भाविक उपस्थित राहत असल्याने या भागात नेहमीच तणावाचे वातावरण होते. अनेकांना रोगमुक्त केल्याचा दावा करत असल्याने त्याच्या सभांना गर्दी होत असत.

धर्मांतराची तक्रार दाखल झाल्याने गुरुवारी संध्याकाळी पोलिसांनी डॉम्निकला सडये येथील घरातून ताब्यात घेत अटक केली. मात्र, हृदयविकाराचा त्रास असल्याने त्याला म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. शुक्रवारी न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केल्यानंतरही तो रुणालयात दाखल होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT