Goa Ganja Seized Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: 27 वर्षीय तरुणाला एक लाखांच्या गांजासह अटक; पणजी पोलिसांची छापेमारी!

27-Year-Old Arrested Goa: पणजी पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापा टाकून बेती येथील 27 वर्षीय तरुणास गांजासह अटक केली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी कांपाल मैदानाजवळ युवराज कराडे (रा. बेती) या तरुणाचा संशय आल्याने ताब्यात घेतले.

Manish Jadhav

पणजी: राज्यात गोवा पोलिसांच्या धडक कारवायांचं सत्र सुरुच आहे. सातत्याने विविध ठिकाणी छापेमारी करुन मोठ्याप्रमाणावर बेकायदेशीर गांजा हस्तगत करुन आरोपींच्या मुसक्या आवळल्या जात आहेत. यातच, शुक्रवारी (6 जून) रात्री पणजी पोलिसांनी छापेमारी करुन बेती येथील एका 27 वर्षीय तरुणाला गांजासह अटक केली.

पणजी पोलिसांची छापेमारी

दरम्यान, पणजी (Panaji) पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापा टाकून बेती येथील 27 वर्षीय तरुणास गांजासह अटक केली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी कांपाल मैदानाजवळ युवराज कराडे (रा. बेती) या तरुणाचा संशय आल्याने ताब्यात घेतले. तसेच, एक एसयूव्ही गाडी आढळली असून गांजाची बाजारभावानुसार किंमत 1 लाख रुपये एवढी आहे. कांपाल परिसरातच यापूर्वी अनेकदा पोलिसांनी गांजा जप्त केला.

साडेसहा लाखांचे चरस जप्त

काही दिवसांपूर्वी, चिवार-हणजूण येथील फुटबॉल मैदान परिसरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे साडेसहा लाख रुपयांचे चरस जप्त केले होते. याप्रकरणी संजय लिकीया दास (वय 26 वर्षे, मूळ झारखंड, सध्या रा. वागातोर) याला पोलिसांनी अटक केली होती. त्याला न्यायालयात हजर केले असता, चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. शुक्रवारी रात्री चिवार-हणजूण येथील फुटबॉल मैदान परिसरात संजय दास हा तरुण ड्रग्स विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिस निरीक्षक सूरज गावस आणि सहकाऱ्यांनी या परिसरात सापळा रचला. संशयित दास ठरलेल्या वेळेनुसार संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मैदान परिसरात येताच पोलिसांनी त्याला घेरुन अटक केली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

SCROLL FOR NEXT