Goa Police News Dainik Gomantak
गोवा

Goa Police: गोव्याची सेक्युरिटी टाईट!! ओळख पडताळणी करण्यासाठी पोलीस तयार करतायत अनोखं ॲप

Goa Visitor Verification App: पडताळणी करण्यासाठी आता गोवा पोलीस एक ॲप तयार करत आहेत

Akshata Chhatre

पणजी: गोव्यात वाढणाऱ्या गुन्ह्यांवर आळा बसवण्यासाठी गोवा पोलिसांनी आता डिजिटल तंत्राची मदत घेण्याची योजना आखली आहे. राज्यात येणाऱ्या भाडेकरू, पर्यटक आणि कामगार यांची पडताळणी करण्यासाठी आता गोवा पोलीस एक ॲप तयार करत आहेत. या नवीन ॲपच्या मदतीने पोलिसांना बाहेरून आलेल्या लोकांची ओळख पडताळणी करणं सोपं जाईल आणि परिणामी वाढणाऱ्या गुन्ह्यांवर आळा बसवायला मदत मिळेल.

क्रिमिनल रेकॉर्ड तपासण्यासाठी आणि व्हिसा ओव्हरस्टे व्हेरिफिकेशन्ससह रिअल-टाइम ओळख पटण्यासाठी हा ॲप सरकारी डेटाबेजचा वापर करेल.

यामुळे गोव्यातील भाडेकरूंची ओळख पटण्यास तसेच त्यांची पडताळणी करण्यास खोलीच्या मालकाला मदत मिळेल. या ॲपमुळे व्यक्तींची नोंदणी आणि पडताळणी करणे सोपे होईल.

हा ॲप केवळ गोव्याबाहेरून आलेल्या लोकांची पडताळणी करण्यातच नाही तर आपत्कालीन सूचना देण्यात सुद्धा मदत करणार आहे. गोव्यात येणाऱ्या लोकांचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पासपोर्ट रेकॉर्ड सारखा केंद्र सरकारचा डेटाबेस ॲपसोबत लिंक केले जाणार असल्याने व्यक्तीची खरी ओळख पटायला मदत मिळेल आणि पर्यटक तसेच स्थानिक यांची सुरक्षा निश्चित करण्यात गोवा पोलिसांना मदत मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

SIR Allegation: 'मतदारांची नावे रद्द करणे हे कटकारस्थान'; सरदेसाईंचा आरोप, दवंडेतील एकाच कुटुंबातील सहा नावे वगळल्याचे उघड

Abhinav Tejarana Captaincy: स्नेहलनंतर अभिनवकडे गोव्याच्या रणजी संघाची धुरा? 7 सामन्यांत 788 धावांचा पाऊस; कर्णधारपदासाठी तेजराणा आघाडीवर

America Visa: भारतीय आयटी प्रोफेशनल्ससाठी महत्त्वाची अपडेट! H-1B व्हिसा नियम मोडणाऱ्या कंपन्यांना 2.4 कोटींच्या दंडासह 10 वर्षांचा बॅन; नव्या विधेयकाने खळबळ

Goa Agriculture: डिचोलीत बळीराजाच्या नजरा आभाळाकडे! भातपीक कणसे धरण्याच्या टप्प्यावर, दमदार पाऊस गायब; हातातोंडाशी आलेला घास करपण्याची भीती

Electricity Tariff Hike: 1 नोव्हेंबरपासून उद्योगांची वीज महागणार! सौर-ऑफपीक वेळेत 80 पैसे, पीक अवरमध्ये 2 रुपये अतिरिक्त

SCROLL FOR NEXT