Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police: निर्वाण करी निर्माण! ब्रेन डेड तरुणाचे अवयवदान; पोलिसांचे ग्रीन कॉरिडॉर

माणुसकीचा संदेश : गोमेकॉतील डॉक्टरांसह पथकाची तत्परता, काही वेळातच हृदय, यकृत पोहचले विमानतळावर

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Police ‘ब्रेन डेड’ झालेल्या 19 वर्षीय तरुणाचे यकृत व हृदय शस्रक्रियेसाठी गोमेकॉतून दाबोळी विमानतळापर्यंत वेळेत पोहोचवण्यासाठी गोवा पोलिसांनी रविवारी सकाळी ग्रीन कॉरिडोर यशस्वीपणे तयार करून महत्त्वाची कामगिरी बजावली.

या तरुणाची दोन्ही मूत्रपिंडे गोव्यातील इस्पितळात तसेच यकृत व हृदय गोव्याबाहेरील गरजू रुग्णांसाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे चार रुग्णांना जीवदान मिळणार आहे.

19 वर्षीय तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला गोमेकॉत 20 मे रोजी दाखल केले होते. उपचार सुरू असतानाच तो ब्रेन डेड झाल्याचे डॉक्टरांनी 26 मे रोजी जाहीर केले.

त्याचे डोके वगळता शरीराचे इतर अवयव चांगले असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी ते दान करण्याचा निर्णय घेतला. त्याचे मूत्रपिंड, यकृत व हृदय हे अवयव काढण्याचा निर्णय झाला.

त्याची मूत्रपिंडे गोव्यातील रुग्णांसाठी तर हृदय व यकृत गोव्याबाहेर पाठवण्याचे ठरवले. त्यानुसार डॉक्टरांनी ‘सोटो गोवा’च्या संचालक प्रीती वर्गीस यांच्याशी संपर्क साधला आणि पुढील हालचालींना सुरुवात झाली.

ब्रेन डेड’ झालेल्या 19 वर्षीय तरुणाचे यकृत व ह्रदय गोव्याबाहेर नेण्यासाठी 28 मे रोजी सकाळी ग्रीन कॉरिडोरची आवश्‍यकता होती त्यामुळे पोलिस खात्याशी संपर्क साधण्यात आला. त्यानुसार हा कॉरिडोर तयार करून हे अवयव गोमेकॉ इस्पितळापासून दाबोळी येथे रस्त्यावर कोणताही अडथळ्याविना पोचवण्यात आले.

दाबोळी विमानतळावरून लगेच ते मुंबई व अहमदाबाद येथे नेण्यात आले. हे दोन्ही अवयव दोन वेगवेगळ्या रुग्णवाहिकेने नेण्यात आले.

ह्रदय अवयव सकाळी 6 वाजता गोमेकॉ इस्पितळातून घेऊन 6.45 वा.च्या पूर्वी दाबोळी विमानतळावर पोचवण्यात आला, तर यकृत अवयव सकाळी 6.30 वा. गोमेकॉ इस्पितळातून घेऊन 7.30 वाजण्यापूर्वी दाबोळी विमानतळावर पोचवला गेला.

एक मूत्रपिंड गोमेकॉ इस्पितळातून सकाळी ७ वाजता रस्त्याने जुने गोवे येथील हेल्थवेस इस्पितळात रुग्णवाहिकेने पोचवण्यात आले, तर एक मूत्रपिंड गोमेकॉ इस्पितळात प्रतीक्षेत असलेल्या रुग्णासाठी वापरले जाणार आहे, अशी माहिती सोटो गोवा कार्यालयातील सूत्राने दिली.

पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी ग्रीन कॉरिडोरसंदर्भात माहिती देताना सांगितले, शनिवारी गोमेकॉ इस्पितळ ते दाबोळी या दरम्यानच्या रस्त्यावर वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उत्तर गोवा, दक्षिण गोवा तसेच वाहतूक पोलिस जागोजागी तैनात करण्यात आले होते.

ह्रदय व यकृत अवयव घेऊन दोन वेगवेगळ्या रुग्णवाहिका दाबोळी येथे जाणार असल्याने त्यावेळेत पोहचण्यासाठी तयारी करण्यात आली व त्यामध्ये यशस्वी ठरल्याचे ते म्हणाले.

शनिवारी 27 मे सोटो गोवा विभागाकडून गोमेकॉतून दाबोळी विमानतळावर अवयव पोहचवण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यासाठी फोन आला होता. हे अवयव घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला कोणताही अडथळा येऊ नये म्हणून आज (रविवारी) पहाटे नियोजन केले होते.- निधीन वाल्सन, पोलिस अधीक्षक

चौघांना मिळाला आशेचा किरण

या तरुणाची मूत्रपिंडे ‘सोटो गोवा’ने गोमेकॉ व हेल्थवेसाठी दिली आहेत, तर रोटो वेस्टने यकृत अहमदाबाद येथील सीआयआयएमएससाठी तर हृदय मुंबईतील एचएन रिलायन्स या इस्पितळासाठी आज पाठविले. या चार अवयवांमुळे चार रुग्णांना आशेचा किरण मिळणार आहे.

समाजमाध्यमांतून कौतुकाचा वर्षाव

मृत तरुणाचे अवयव काढून ते वेळेत पोहचवण्यासाठी ‘सोटो गोवा’च्या संचालक प्रीती वर्गीस यांनी मोलाची कामगिरी बजावली. पोलिसांनी ग्रीन कॉरिडोर करून देण्याबरोबरच ‘सोटो गोवा’च्या डॉक्टरांनी अवयव काढून ते वेळेत पोहचवण्यासाठी परिश्रम घेतले. पोलिस व डॉक्टरांच्या या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: धक्कादायक! वडिलांवर धारदार शस्त्राने वार करून मुलाने संपवले जीवन; उसगावात खळबळ

Rashi Bhavishya 14 November 2024: व्यवसायातून खास फायदा होईल, आपल्या दिलदार स्वभावामुळे लोकं प्रसन्न राहतील; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Cash For Job Scam: 'मुख्यमंत्र्यांनी नोकरीत घोटाळा करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी', नरेश सावळ यांचे आवाहन

Cuncolim IDC: कुंकळ्ळी औद्योगिक वसाहत होणार दुर्गंधीमुक्त! पोलाद कारखाना, वृक्ष लागवडीसाठी होणार सांडपाण्‍याचा पुनर्वापर

'Cash For Job' ची दिल्लीत चर्चा! नोकर भरतीसंदर्भात श्‍वेतपत्रिका काढा; काँग्रेस सचिव शर्मा कडाडले

SCROLL FOR NEXT