Rinku Singh Father passes away: क्रिकेटपटू रिंकू सिंहवर कोसळला दुःखाचा डोंगर; वडिलांचे निधन, अनेक दिवसांपासून होते आजारी

Cricketer Rinku Singh's father passes away: भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज रिंकू सिंह याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Rinku Singh Father passes away
Rinku Singh Father passes awayDainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज रिंकू सिंह याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रिंकूचे वडील खचंद्र सिंह यांचे प्रदीर्घ आजारानंतर निधन झाले आहे. त्यांनी उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील यथार्थ रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती, ज्यामुळे रिंकूला भारतीय संघाची साथ सोडून तातडीने घरी परतावे लागले होते.

कर्करोगाच्या चौथ्या टप्प्याशी झुंज अपयशी

मिळालेल्या माहितीनुसार, खचंद्र सिंह हे 'स्टेज-४' च्या यकृत कर्करोगाशी (Liver Cancer) झुंज देत होते. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या पथकाने त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. गेल्या काही दिवसांपासून ते मेकॅनिकल व्हेंटिलेटर सपोर्टवर होते आणि त्यांना सतत 'रीनल रिप्लेसमेंट थेरेपी' दिली जात होती. मात्र, कर्करोग शेवटच्या टप्प्यात असल्याने उपचारांना प्रतिसाद देणे कठीण झाले होते आणि अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

Rinku Singh Father passes away
Goa Crime: मायणा-कुडतरीत खळबळ! फूस लावून पळवून अल्पवयीन मुलीचं अपहरण, संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल; पालकांचा गंभीर आरोप

वडिलांच्या भेटीसाठी सराव सत्राला मारली होती दांडी

रिंकू सिंह हा आपल्या वडिलांच्या खूप जवळ होता. मंगळवारी, २४ फेब्रुवारी रोजी चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर भारतीय संघाचे महत्त्वाचे सराव सत्र आयोजित करण्यात आले होते. मात्र, वडिलांची प्रकृती खालावल्याची बातमी मिळताच रिंकूने सरावात सहभागी न होता थेट नोएडा गाठले.

इतर खेळाडू मैदानात घाम गाळत असताना रिंकू मात्र रुग्णालयात आपल्या वडिलांच्या आयुष्यासाठी प्रार्थना करत होता. मूळचा अलीगडचा असलेल्या या २८ वर्षीय खेळाडूने अत्यंत गरिबीतून वर येत क्रिकेट विश्वात नाव कमावले आहे, ज्यामध्ये त्याच्या वडिलांचा मोठा संघर्ष होता.

Rinku Singh Father passes away
Goa Bangladeshi Deportation: पर्यटन नगरीत घुसखोरांचा सुळसुळाट, 6 बांगलादेशींची हकालपट्टी; गोवा पोलिस 'ॲक्शन मोड'मध्ये

टी-२० विश्वचषकादरम्यान खराब फॉर्म आणि मानसिक दडपण

२०२६ च्या टी-२० विश्वचषकात रिंकू सिंह भारतीय संघाचा भाग होता. ग्रुप स्टेजमधील सर्व सामन्यांमध्ये त्याला संधी मिळाली होती, तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सुपर-८ सामन्यातही तो खेळला होता. मात्र, या संपूर्ण स्पर्धेत रिंकूच्या बॅटमधून धावा निघत नव्हत्या. घरच्या ओढ्यामुळे आणि वडिलांच्या आजारपणामुळे तो मानसिक दडपणाखाली असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यापूर्वी तो संघात परतला होता, पण त्याला अंतिम अकरामध्ये (Playing XI) स्थान मिळाले नव्हते. आता वडिलांच्या निधनामुळे क्रिकेट विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com