Goa Environment Film Festival 2023:
Goa Environment Film Festival 2023:Dainik Gomantak

Goa Environment Film Festival: पहिला गोवा पर्यावरणीय चित्रपट महोत्सव 3 जूनपासून

जगभरातील 50 हून अधिक चित्रपट पाहता येणार
Published on

Goa Environment Film Festival 2023: भारताच्या अध्यक्षतेखाली आयोजित केल्या जाणाऱ्या जी-20 परिषदेच्या पार्श्वभुमीवर पहिल्या गोवा पर्यावरणीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन 3 जूनपासून करण्यात येणार आहे.

Goa Environment Film Festival 2023:
Mopa Airport: मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिव्यांग प्रवाशांना मदतीसाठी कर्मचाऱ्यांना देणार प्रशिक्षण

महत्वाच्या पर्यावरणीय मुद्यांवर प्रकाश टाकणाऱ्या चित्रपटांवर आधारीत हा महोत्सव आहे. 3 जून ते 5 जून या काळात हा महोत्सव होणार आहे. गोवा मनोरंजन सोसायटी, कांपाल येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवकाळात जगभरातील 50 हून अधिक चित्रपट पाहायला मिळणार आहेत.

या महोत्सवासाठी नोंदणी सुरू झाली आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी www.goaeff.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल. गोव्याच्या माहिती आणि प्रसिद्धी खात्यातर्फे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com