CM Pramod Sawant on New Parliament: नव्या संसदेच्या भूमिपूजनावेळी वापरली होती गोव्याची माती, वाचा काय म्हणाले मुख्यमंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या उपस्‍थितीत दिमाखात नवीन संसद भवनाचे उद्घाटन
New Parliament Building
New Parliament BuildingDainik Gomantak

CM Pramod Sawant on New Parliament: बहुप्रतिक्षीत नवीन संसद भवनाचे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या उपस्‍थितीत दिमाखात उद्घाटन झाले. या सोहळ्याला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते.

यावेळी सभागृहात नवीन संसद आणि सेंगोलवर (राजदंड) लघुपट दाखवण्यात आला आणि 75 रुपयांचे नाणे जारी करण्यात आले.

New Parliament Building
Borim ISKCON Project : बेतकी बोरी येथे इस्कॉन प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध

सोहळ्याला उपस्थित मुख्यमंत्री. डॉ. सावंत यांनी याबाबत ट्विट केले आहे. ते म्हणाले, "पंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसदेच्या उद्घाटनाच्या ऐतिहासिक क्षणाचा भाग होण्याचा आणि गोव्याचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला.

भूमिपूजनाच्या वेळी आपल्या गोव्यातील माती पाठवून नवीन संसदेच्या बांधकामाचा भाग बनवला. नवीन संसद भारताचे सार प्रतिबिंबित करते. भारतातील लोकांची सेवा करेल आणि येत्या काही वर्षांत भारताचे भविष्य घडवेल असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.

New Parliament Building
Girish Chodankar : काँग्रेस नेते गिरीष चोडणकरांची सभापतींवर टिका; संजय राउतांची घेतली भेट

संसदेत सेंगोलची स्थापना

आज ऐतिहासिक क्षणी संसदेत पवित्र सेंगोलची स्थापना झाली आहे. महान चोल साम्राज्यात सेंगोलला कर्तव्यपथ, सेवा पथ, राष्ट्र पथाचे प्रतिक मानले जाते. हा सेंगोल सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक बनला होता. लोकसभेचे काम सुरू असेल तेव्हा सेंगोल प्रेरणा देत राहील, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

वैशिष्ट्ये अशी...

  1. नव्या संसदभवनाची इमारत त्रिकोणी आकाराची, त्‍याला 4 मजले आहेत.

  2. तब्‍बल 64 हजार 500 स्वेअर मीटर जागेवर ही इमारत उभी राहिली आहे.

  3. उभारणीसाठी 970 कोटी रुपयांचा खर्च आला. ही इमारत अत्याधुनिक आहे.

  4. नव्या संसदेत ग्यान द्वार, शक्ती द्वार आणि कर्म द्वाराने प्रवेश होईल.

  5. एकूण 1224 खासदार बसू शकतील, अशी व्यवस्था करण्‍यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com