Sexual Assault Case Dainik Gomantak
गोवा

Sexual Assault Case: गुन्हे शाखेच्या कार्यालयात अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा आरोप; पोलिस निरीक्षकावर अखेर निलंबनाची कारवाई

Goa Police Inspector POCSO Case: गुन्हे शाखा कार्यालयात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप असलेले पोलिस निरीक्षक विकास देयकर यांना निलंबित करण्यात आले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गुन्हे शाखा कार्यालयात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप असलेले पोलिस निरीक्षक विकास देयकर यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी या निलंबनाची पुष्टी केली. या कारवाईमुळे पोलिस विभागात खळबळ उडाली आहे.

गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास देयकर यांच्यावर अल्पवयीन मुलीच्या लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप लावण्यात आले असून त्याच्यावर आणि त्याला साथ देणाऱ्या त्याच्या मैत्रिणीवर पॉक्सो कायद्यांतर्गत जुने गोवा पोलिस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याविषयी आलोक कुमार यांनी निरीक्षकावर कायद्यानुसार योग्य ती कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्टीकरण दिले. या प्रकरणात कायदेशीर आणि विभागीय अशा दोन्ही प्रकारच्या कारवाया सुरू करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, आलोक कुमार यांनी स्पष्ट केले की, गोवा पोलीस कोणत्याही प्रकारच्या गंभीर गुन्ह्याबाबत किंवा गैरवर्तनाबाबत अत्यंत कठोर भूमिका घेत आहे. अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या या गंभीर प्रकरणाची दखल घेत विभागाने तातडीने पावले उचलली असून, सध्या कायदेशीर आणि विभागीय पातळीवर आवश्यक ती कारवाई सुरू असल्याचे त्यांनी आज सांगितले.

तक्रारीनुसार, पोलिस निरीक्षकाने गुन्हे शाखेच्या कार्यालयात २५ जुलै २०२६ आणि २७ ऑक्टोबर २०२६ रोजी दोन वेगवेगळ्या प्रसंगी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. तर त्याच्या मैत्रिणीने या कृत्यासाठी साहाय्य केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

पीडितेची सुरक्षा बालकल्याण समितीकडे

जुने गोवे पोलिस ठाण्यात सायबर गुन्हे विभागातील पोलिस निरीक्षकाविरोधात दाखल झालेल्या लैंगिक आगळीक प्रकरणाची गोवा राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने दखल घेतली आहे. पीडित मुलीची सुरक्षितता आणि संरक्षण सुनिश्चित करण्याचे निर्देश आयोगाने बालकल्याण समितीला दिले आहेत. तसेच या प्रकरणाच्या तपासाबाबत जुने गोवे पोलिस ठाण्याकडून सविस्तर अहवाल मागविण्याचा निर्णयही आयोगाने घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: फुटबॉल खेळताना मुलांच्या दोन गटांत वाद; अल्पवयीनावर कुत्रा सोडून दांडक्याने मारहाण, आरोपीला अटक

Kadamba Bus Service: कदंब बसप्रवास आता स्वस्त! स्मार्ट कार्डधारकांना 20 टक्के, नियमित प्रवाशांना 30 टक्के सवलत

EPFO WhatsApp Service: आता 'व्हॉट्सअ‍ॅप'वरच मिळणार PF खात्याचा संपूर्ण हिशेब! जुनी बंद पडलेली खातीही होणार ऑटो-सेटल, केंद्रीय मंत्र्यांची मोठी घोषणा

ST Reservation: एसटी आरक्षणाचा पेच सुटणार? गोवा सरकार 2013 च्या अधिसूचनेचा आधार घेऊन सर्वोच्च न्यायालयात जाणार

VIDEO: बापरे, हे तर पैशांचं घबाड! जमिनीखाली पुरलेल्या तीन ड्रममधून तब्बल 3 कोटी 20 लाखांची रोकड जप्त, आयकर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT