Tourist
Tourist  Dainik Gomantak
गोवा

Miramar : पर्यटकांना पोलिसांचा दणका; बसचालकालाही ठोठावला दंड

गोमन्तक डिजिटल टीम

Miramar : सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा आदेश पर्यटन खात्याने काही दिवसांपूर्वी दिला होता. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी राज्यभरात कारवाईचे सत्र सुरू केले आहे.

पणजी पोलिसांनी सोमवारी सायंकाळी काही पर्यटकांना दंड ठोठावला आहे. तेलंगणा येथील पर्यटक मिरामार येथे मद्यपान करून उपद्रव करत होते. यावेळी पोलिसांनी ही कारवाई केली. तर पर्यटकांना थांबविल्याबद्दल बसचालकालादेखील दंड ठोठावण्यात आला आहे.

मिरामार येथे मद्यपान करून उपद्रव करणाऱ्या तेलंगणा येथील पर्यटकांना दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. गोवा पर्यटनस्थळांचे संरक्षण आणि देखरेख कायदा २००१ अंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पणजी पोलिसांनी दिली आहे.

तेलंगणातून आलेल्या पर्यटकांनी भाड्याने बस केली होती. मिरामार येथे सायन्स सेंटरजवळ मद्यपान करून तेथे उपद्रव केला. त्यानंतर त्यांनी परिसरात कचरा केल्याचे नागरिकांच्या लक्षात येताच पोलिसांना सूचित करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आणि पर्यटकांना दंडीत केले. पर्यटकांना थांबविल्याबद्दल बसचालकालादेखील दंड ठोठावला.

कायदा मोडणाऱ्यांवर केली कारवाई

सार्वजनिक स्थळांवर मद्यपान करणे, जेवण बनविणे, कचरा टाकणे, समुद्रकिनारी वाहन चालविणे, दलाल, फेरीवाले आणि पर्यटन उद्योगात बेकायदेशीर कारभार करणाऱ्यांविरोधात कारवाईचा आदेश काढला होता. त्यानंतर पोलिसांनी कारवाई सत्र सुरू केले असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींना दंडीत केले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: लोकांचा भाजपविरोधातील राग व्यक्त, दोन्ही जागा जिंकण्याचा इंडिया आघाडी दावा

Yellow Alert In Goa: गोव्यात पुढील सहा दिवस पावसाची शक्यता, दोन दिवसांसाठी 'यलो अलर्ट'

Donation: उल्‍हास वेर्लेकर कुटुंबियांकडून गोव्‍यातील दहा संस्‍थांना प्रत्‍येकी एक लाखाची देणगी

Chhattisgarh: छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई; 12 नक्षलवादी ठार!

Brij Bhushan Sharan Singh: ब्रिजभूषण शरण सिंह यांना मोठा झटका; कोर्टाने लैंगिक छळाचे आरोप केले निश्चित

SCROLL FOR NEXT