Goa Drug Bust Dainik Gomantak
गोवा

Goa Drug Bust: कळंगुट पोलिसांची मोठी कारवाई; सिकेरीत 'इतक्या' लाखांच्या गांजासह पश्चिम बंगालचा तस्कर गजाआड

Goa Drug Bust Sinquerim: गोव्यातील पर्यटन स्थळांवर अंमली पदार्थांच्या वाढत्या प्रभावाविरुद्ध पोलिसांनी आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे.

Sameer Amunekar

पणजी: गोव्यातील पर्यटन स्थळांवर अंमली पदार्थांच्या वाढत्या प्रभावाविरुद्ध पोलिसांनी आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे. कळंगुट पोलिसांनी उत्तर गोव्यातील सिकेरी येथे छापा टाकून एका ४० वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी लाखो रुपयांचा अंमली पदार्थ जप्त केला असून, या प्रकरणाचे धागेदोरे शोधण्याचे काम सुरू आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कळंगुट पोलीस पथकाने सिकेरी भागात सापळा रचला होता. संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका व्यक्तीची झडती घेतली असता, त्याच्याकडे अंमली पदार्थांचा साठा आढळला. 

अटक करण्यात आलेला आरोपी मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे. पर्यटकांच्या गर्दीचा फायदा घेऊन हा आरोपी अंमली पदार्थांची विक्री करण्याचा प्रयत्न करत असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

लाखांचा गांजा जप्त

या छाप्यात पोलिसांनी संशयिताकडून अंदाजे १.१० लाख रुपये किमतीचा 'गांजा' जप्त केला आहे. गोव्यात सध्या पर्यटनाचा हंगाम सुरू असल्याने किनारपट्टी भागात अंमली पदार्थांची मागणी वाढते, याच संधीचा फायदा घेत परराज्यातील तस्कर गोव्याकडे वळत असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

तपासाची चक्रे फिरली

कलंगुट पोलिसांनी याप्रकरणी अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत (NDPS Act) गुन्हा दाखल केला आहे. हा आरोपी गोव्यात कोणाला माल पुरवणार होता? यात आणखी मोठ्या टोळीचा सहभाग आहे का? आणि हा माल पश्चिम बंगालमधून आणला होता की स्थानिक स्तरावर मिळवला होता? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलीस सध्या आरोपीची कसून चौकशी करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Under 23 Cricket: कर्नल नायडू करंडकात गोव्याचा पराभव; बडोद्याची 4 विकेट्सनी बाजी

National Shilp Guru Award: गोव्याच्या मातीकलेचा राष्ट्रीय गौरव! अमर शेट यांना 'राष्ट्रीय शिल्पगुरू पुरस्कार'

Yuzvendra Chahal: वर्ल्ड कप 2023 मधून पत्ता का कट झाला? युजवेंद्र चहलचा मोठा खुलासा; म्हणाला, 'रोहित शर्माने मला आधीच सांगितले होते...'

Unnatural Death Case: नागव्यात 17 वर्षीय मुलाची आत्महत्या; हणजूण पोलिसांकडून तपास सुरू

Tesla Roadster Flying Car: रस्त्यावर धावणारी कार आता हवेतही उडणार! हेलिकॉप्टरसारखी लँडिंग, थ्रस्टरच्या मदतीने भन्नाट स्टंट Watch Video

SCROLL FOR NEXT