Goa Police

 

Dainik Gomantak

गोवा

तपासकामात गोवा पोलिस देशात सर्वोत्तम; कुडचडे, वेर्णा, कळंगुटचा गौरव

पोलिस खात्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या 54 पोलिसांना पोलिस महासंचालक इनसिग्निया पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

दैनिक गोमन्तक

पणजी : गोवा पोलिसांची तपासकामातील टक्केवारी 83 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. ही देशातील सर्वोत्तम कामगिरी आहे. राज्यात मोठ्या प्रमाणत देशी व विदेशी पर्यटकांचा ओघ असतो तरीही गोवा पोलिसांनी सुरक्षेची जबाबदारी योग्यप्रकारे बजावली आहे. ‘पिंक फोर्स’ तसेच सायबर क्राईम लॅबमुळे पोलिसांच्या कामाला अधिक बळकटी मिळाली आहे, असे मत राज्याचे पोलिस महासंचालक इंद्रदेव शुक्ला यांनी व्यक्त केले.

पणजीतील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर आज गोवा पोलिस स्थापनादिन आयोजित करण्यात आला. यावेळी महासंचालकांनी पोलिस परेडची पाहणी केली व त्यानंतर पोलिस संचलनही झाले. यावेळी पोलिस खात्यातील अधिकारी व पोलिस कर्मचारी उपस्थित होते. पोलिस खात्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या 54 पोलिसांना पोलिस महासंचालक इनसिग्निया पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

राज्यातील सर्वोत्कृष्ट पोलिस स्थानकामध्ये प्रथम क्रमांक कुडचडे, द्वितीय वेर्णा व तृतीय कळंगुट पोलिस स्थानकांना फिरता चषक तसेच रोख रक्कमेचे बक्षीस महासंचालकांच्या हस्ते देण्यात आले.

पोलिस महासंचालक शुक्ला यांनी पोलिस कर्मचाऱ्यांनी गोवा मुक्तिदिन (Goa Liberation) तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गोवा दौऱ्यावेळी बजावलेल्या चोख बंदोबस्ताबद्दल प्रशंसा केली. खात्यातील सर्व विभाग चांगल्या प्रकारे काम करत असून ते त्यांनी पुढे सुरूच ठेवण्याचे आवाहन केले. कोरोना महामारीच्या काळात पोलिसांनी व गृहरक्षकांनी केलेले काम वाखाणण्याजोगे होते. अंमलीपदार्थ प्रतिबंधक कक्ष व जिल्हा पोलिसांनी गेल्या वर्षभरात 100 हून अधिक अंमलीपदार्थ विक्रेत्यांना अटक करून चांगली कामगिरी केली. गोवा हे अंमलीपदार्थ निर्मिती केंद्र नाही मात्र तरीही अंमलीपदार्थाचा व्यवहार होत असला तरी पोलिस त्याबाबत दक्ष आहेत व त्यामुळे ही एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई करणे शक्य झाले आहे, असे ते म्हणाले.

सायबर क्राईम (Cyber Crime) कक्षात फक्त 16 प्रकरणेच नोंद झाली आहेत. राज्यात येणारे पर्यटक अधिक तर लुबाडले गेले तरी तक्रार नोंद करण्यास पुढे येत नाही. सायबर क्राईम कक्षाचे पोलिस व पर्यटक यांच्यात असलेले अंतर कमी करण्याची गरज आहे. नवी सायबर क्राईम लॅब अत्याधुनिक झाली आहे. त्यामुळे संशयितांना गजाआड करणे शक्य होत असल्याचा विश्‍वास त्यांच्यात जागवण्याची आवश्‍यकता आहे. पोलिस खात्यात असलेल्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे कर्मचाऱ्यांवर ताण येतो; मात्र सुमारे 2 हजार पोलिस भरती सुरू आहे. हे कर्मचारी दाखल झाल्यावर पोलिस खाते अधिक सक्षम होईल. प्रत्येक पोलिसांनी सर्वोत्कृष्ट काम करून आपले नाव कमवावे. पोलिसांना बढत्या देण्याचे काम सुरू आहे, असे आवाहन शुक्ला यांनी केले.

पोलिसांनी साधावा थेट संवाद

पोलिस खात्यातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या बदल्या, बढती, आरोग्य, रजा किंवा इतर कामासंदर्भात गाऱ्हाणी असल्यास ते पोलिस महासंचालकांशी थेट भेटू शकतात किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेही बोलू शकतात. प्रत्येक बुधवारी सकाळी 11 ते 12 हा वेळ पोलिस कर्मचाऱ्यांसाठीच राखीव ठेवला आहे. या वेळेत ते आपली समस्या मांडू शकतात. त्यावर योग्य निर्णय घेऊन सोडविल्या, जातील असे महासंचालक इंद्रदेव शुक्ला म्हणाले.

नाताळ व नववर्षासाठी मोठ्या प्रमाणात गोव्यात देशी व विदेशी पर्यटक येत असतात. त्यामुळे किनारपट्टी भागातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली आहे. पोलिस गस्त तसेच त्या भागातील बीट पोलिसही सतर्क करण्यात आले आहे. गोवा पोलिस (goa-police) या पर्यटकांच्या सेवेसाठी सज्ज असतील व कोणताही अनुचित घटना घडू नये यासाठी रात्री उशिरापर्यंतही पोलिसांनी समुद्रकिनारी भागात तैनात केले जाणार आहे. - इंद्रदेव शुक्ला, पोलिस महासंचालक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cristiano Ronaldo: रोनाल्डो 'गोव्यात' खेळणार की नाही? सुरक्षा यंत्रणा घेणार निर्णय; देशभरातील फुटबॉलप्रेमी आशावादी

Goa AAP: 'गोव्यात काँग्रेसने जनतेचा विश्‍वास गमावला'! आतिषी यांचे प्रतिपादन; आघाडी करणार नसल्याचा पुनरुच्चार

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात अशीही बनवाबनवी

Goa Cabinet: चतुर्थीपूर्वी मंत्रिमंडळात होऊ शकतो बदल; दामू नाईकांचा संकेत; मुख्‍यमंत्र्यांकडून ‘सस्‍पेन्‍स’ कायम

Coconut Price Goa: 45 रुपयांचा नारळ स्वस्त कसा? विजय सरदेसाईंचा सवाल

SCROLL FOR NEXT