राज्यभर बेकायदेशीर नोकरभरतीवरून वादंग; नियुक्तीपत्रे तग धरणार का?

सध्‍या सत्तरीत नोकरभरतीबाबत बरीच भीती उमेदवारांच्या मनात आहे
Goa Government

Goa Government

Dainik Gomantak

वाळपई : सद्या राज्यभरात बेकायदेशीर नोकरभरतीवरून मोठ्या प्रमाणात वादंग सुरू आहेत. सार्वजनिक बांधकाम, आरोग्य खाते, अन्न व औषध खाते अशा विविध खात्यात सरकारने जाहिराती प्रसिद्ध करून पदे जाहीर केली होती. पण, या प्रक्रियेत दिवसेंदिवस अडचणीत वाढ होत आहे. विशेष करून सत्तरी तालुक्यातून काहींनी सार्वजनिक बांधकाम विभागात अर्ज केले होते. प्राप्त माहितीनुसार सत्तरी तालुक्यातून सार्वजनिक बांधकाम खात्यात काढलेल्या पदांसाठी काहींची निवड केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

<div class="paragraphs"><p>Goa Government</p></div>
आमदार अपात्रतेवरील सुनावणी 5 जानेवारीपर्यंत तहकूब

पण, आता मुख्यमंत्री (Chief Minister) सावंत यांनी समिती स्थापन करून चौकशीचे आदेश दिल्यानंतर याविषयी आणखी चिंतेची स्थिती निर्माण झाली आहे. पणजीत काँग्रेसच्या (Congress) युवा नेत्यांनी उद्या दक्षता खात्याकडे तक्रार दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

त्‍यामुळे सत्तरी तालुक्यातील उमेदवारांत धाकधूक वाढली आहे. सत्तरी तालुक्यातून हजारो इच्छुक युवा नागरिकांनी आरोग्य खात्यात नोकरभरती विषयी पावले उचलली आहेत. पण, आता राज्यात नोकरभरती ही सदोष पद्धतीने करीत असल्याचा आरोप करून खुद्द भाजपचेच आमदार आवाज उठवत आहेत. त्यावरून विरोधकांना आयतेच कोलीत हातात मिळाल्याने आता नोकरीभरती प्रकरण बरेच तापले आहे. सत्तरी तालुक्यात वाळपई व पर्ये मतदारसंघातून (Constituency) आता याविषयी चर्चा वाढू लागली आहे. दिलेली नियुक्तीपत्रे तग धरणार की रद्द होतील, याबाबत भीती वाढली आहे.

<div class="paragraphs"><p>Goa Government</p></div>
अलेक्सो रेजिनाल्डो यांनी पक्षप्रवेशानंतर ममता बॅनर्जींची घेतली भेट !

विरोधकांनी सरकार (Government) विरोधात ताशेरे ओढीत नोकरभरती रद्द करावी, असा जोर धरलेला आहे. आरोग्य खात्यात बहुतांश नोकऱ्या सत्तरीत दिल्याचा आरोप पणजी येथील भाजपचे आमदार मोन्सेरात व विरोधकांनी केली आहे. त्याचा परिणाम आता सत्तरीत दिसून येण्याची शक्यता आहे. सध्‍या सत्तरीत नोकरभरतीबाबत बरीच भीती उमेदवारांच्या मनात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com