Goa Police Custody Violence Dainik Gomantak
गोवा

Goa Police Custody Violence: काळे-निळे पडेपर्यंत चौघांना अमानुष मारहाण, गोव्यात पुन्हा पोलिसांची दादागिरी; एसपींनी एका पोलिसाला केलं निलंबित!

maina curtorim police custody torture suspension: म्हापसा पोलिस ठाण्यात एका विद्यार्थ्याला पोलिसांकडून कथितरित्या मारहाण झाल्यामुळे त्याने आत्महत्या केली.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मडगाव: म्हापसा पोलिस ठाण्यात एका विद्यार्थ्याला पोलिसांकडून कथितरित्या मारहाण झाल्यामुळे त्याने आत्महत्या केली, असा आरोप होत असतानाच दक्षिण गोव्यातील मायणा-कुडतरी पोलिस स्थानकात ताब्यात घेतलेल्या चौघांना काळे-निळे पडेपर्यंत मारहाण करण्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई यांनी एका पोलिस शिपायाला निलंबित केले आहे.

निलंबित करण्यात आलेल्या पोलिस शिपायाचे नाव चेतन कोळी असे असून त्याच्याविरुद्ध खात्यांतर्गत कारवाई सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती प्रभुदेसाई यांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, ६ जून रोजी रात्री रामनगरी-नेसाय येथे दोन गटांमध्ये झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर संबंधित चौघांना मायणा-कुडतरी पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिस स्थानकात आणले होते. त्यांना रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले होते.

याच काळात पोलिस शिपाई चेतन कोळी याने चौघांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यापैकी एका व्यक्तीच्या हातावर गंभीर स्वरूपाचे व्रण व सूज दिसून आली. या घटनेनंतर पोलिसांच्‍या वर्तनाबाबत पुन्‍हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, या घटनेची सत्यता, मारहाणीचे स्वरूप आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी सखोल विभागीय चौकशी करण्यात येणार असून, चौकशी अहवालानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.

प्रथमदर्शनी तथ्‍य आढळल्‍याने कारवाई

यासंदर्भात मायणा-कुडतरी पोलिस स्थानकाचे निरीक्षक कपिल नायक यांच्याशी संपर्क साधला असता, रात्री उशिरा हा प्रकार घडल्याचे त्‍यांनी सांगितले. संबंधित पोलिस कर्मचाऱ्याचा या घटनेत सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी आढळल्याने त्याबाबतचा अहवाल दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांकडे पाठविण्यात आला होता. तेथून निलंबनाचा आदेश काढण्‍यात आला.

म्‍हापसा प्रकरणात पोलिसांचे कानावर हात

म्‍हापशातील (Mapusa) सॅम्युअल ब्रागांझा याच्‍या मृत्‍यूप्रकरणाची चौकशी पोलिस अधीक्षक विश्वेश कर्पे यांनी सुरू केली आहे. घटनेच्या दिवशी ड्युटीवर असलेले पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची दोन दिवस चौकशी करून जबाब नोंदवून घेण्‍यात आले. चौकशीवेळी त्‍यांनी सांगितले की, सॅम्युअलला मारहाण केलेली नाही; कायदेशीर नोटीस बजावली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT