

पणजी: राज्यातील पोलिस तपासाच्या कार्यपद्धतीवर न्यायालयाने ओढलेले ताशेरे आणि पोलिस अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या गंभीर चुका यांमुळे पोलिस दल सध्या टीकेचे धनी बनले आहे. मांद्रे येथील श्री देवी भूमिका मंदिर प्रकरणातील ‘कॅज्युअल’ तपास असो किंवा इतर प्रकरणांमधील न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रकार, या सर्व बाबींमुळे पोलिस यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर आता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणांची गंभीर दखल घेतली असून चौकशीचे संकेत दिले आहेत. मंदिरातील कुलूप बदलल्याप्रकरणी दाखल केलेल्या प्रकरणात न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात मांद्रेतील तपास अधिकाऱ्याने अत्यंत ‘कॅज्युअल’ पद्धतीने आरोपपत्र दाखल केल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.
शिवाय, मांद्रे पोलिस स्थानकातील एका प्रकरणात न्यायालयाने संशयिताला पोलिस कोठडी दिली नसतानाही तपास अधिकाऱ्याने लेखी उत्तरात तसा खोटा दावा केल्याचे समोर आले. त्यावर ‘अजाणतेपणी चूक झाली’, असे म्हणत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या या अधिकाऱ्यावर न्यायालयाची दिशाभूल केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
न्यायालयाने वारंवार ओढलेले ताशेरे आणि पोलिसांची बेकायदेशीर कार्यपद्धती यांमुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याची चर्चा सुरू आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या गंभीर प्रकरणांची दखल आता पोलिस दलातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी घेतली आहे. न्यायालयाच्या निरीक्षणानुसार त्या अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीचे संकेत ‘गोमन्तक’ने वृत्त प्रसिद्ध केल्यावर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.