Goa Police Crime News: Daiinik Gomantak
गोवा

Goa Police Crime News: धक्कादायक! पोलिसाकडूनच महिलेचा पाठलाग; पतीलाही दिली धमकी

संबंधित कॉन्स्टेबलला म्हापसा पोलिसांनी केली अटक

Akshay Nirmale

Goa Police Crime News: गोवा विद्यापीठातील विद्यार्थिनीचा पोलिस अधिकाऱ्याने विनयभंग केल्याचे कथित प्रकरण ताजे असतानाच आता आयआरबी पोलिसाने महिलेचाच पाठलाग केल्याचे प्रकरण समोर आले आहे. संबंधित पोलिस कॉन्स्टेबलने एका महिलेचा पाठलाग केला. तिच्यासह तिच्या पतीला त्याने धमक्याही दिल्याची घटना समोर आली आहे.

सूरज शैलेंद्र सक्सेना (रा. चिंबल, तिसवाडी) असे या पोलिस कॉन्स्टेबलचे नाव आहे. म्हापसा पोलिसांत याबाबत संबंधित महिलेने तक्रार दाखल केल्याचे समजते. या तक्रारीनंतर 28 वर्षीय विवाहितेचा विनयभंग करून तिला व तिच्या पतीला शिवीगाळ करीत धमकी दिल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित पोलिस कॉन्स्टेबल सक्सेनाचा एक साथीदार या प्रकरणात फरार झाला आहे. त्याचाही शोध घेतला जात आहे. प्राप्त माहितीनुसार ही घटना 1सप्टेंबरला पोंबुर्फामध्ये घडली होती. वैयक्तिक संपर्क वाढविण्याच्या हेतूने संशयित सुरजने तक्रारदार पीडित विवाहितेचा पाठलाग करून तिचा विनयभंग केला.

तसेच घटनास्थळी संशयिताने पीडिता व तिच्या पतीला शिवीगाळ करून धमकी दिली. या प्रकरणी पीडितेने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर म्हापसा पोलिसांनी संशयित व त्याचा मित्र बपीत नाईक याच्यावर गुन्हा नोंदविला आहे.

दरम्यान, ज्या पोलिसांनी संरक्षण करायचे, त्यांच्याकडून महिलांबाबत असे प्रकार घडत असल्यावरून आता राज्यातील पोलिस दलाविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Coconut Price: महागाईत गणेशोत्सवाचा आनंद वाढला! म्हापशात अवघ्या 2 रुपयांत नारळ; दोन दिवसांत तब्बल 9 ते 10 हजार नारळांचे वाटप

Galjibaga Beach: गालजीबाग किनाऱ्याचे अस्तित्वच धोक्यात! अनेक वर्षांपासून सुरू असलेली धूप वाढली; वनखात्याचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा माजी नगरसेवकांचा आरोप

VIDEO: रोहित शर्मा वनडे वर्ल्ड कप खेळणार की नाही? 'हिटमॅन'च्या उत्तरानं चाहत्यांची धाकधूक वाढवली; पाहा व्हायरल व्हिडिओ!

Goa Agriculture: गोव्यात चारा टंचाईवर सरकारचा मोठा प्लॅन! लागवड क्षेत्राच्या 5 टक्के जमिनीवर चारा पिके; 10 हजार हेक्टरचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य

गुन्ह्यातील पीडितांना मिळणार आर्थिक आधार! गोवा सरकारची नवी 'पीडित भरपाई योजना २०२६' लागू; ॲसिड हल्ल्यात 5 लाखांपर्यंत मदत

SCROLL FOR NEXT