Night Club In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Night Club: कळंगुट, बार्देशमधील बेकायदेशीर नाईटक्लबवर पोलिसांची धडक कारवाई; तब्बल 11 नाईटक्लब सीलबंद

Goa Night Club: गोव्यातील किनारी परिसरावर पोलिसांची करडी नजर

Ganeshprasad Gogate

Goa Night Club: गेल्या काही दिवसांपासून राज्यात चालणाऱ्या बेकायदेशीर नाईटक्लबचा मुद्दा गाजत होता. सरकारने पोलीस आणि संबंधित खात्याला या प्रकरणी कडक कारवाईचे आदेशही दिले होते.

याच आदेशाच्या अनुषंगाने कलेक्टर, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलिसांनी कळंगुट- बार्देश येथे बेकायदेशीरपणे चालणारे 11 नाईट क्लब बंद केले आहेत. गुरुवारी रात्री 10 च्या सुमारास ही धडक कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळतेय.

या धडक कारवाईत सीलबंद केलेल्या नाइटक्लबची यादी:

1. नॉर्म्स पब

2. शील्ड/नेक्स्ट लेव्हल

3. मेहफिल

4. डेव्हिल्स क्लब

5. थ्री किंग

6. 39 स्टेप्स

7. पॉश नोश

8. ब्लॅक हार्ट

9. ट्रॉपिकल 24*7

10.कोड्ढा

11.प्लांटेशन लीफ रेस्ट

गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेश क्रमांक 1/25/23-DCB/Tech/2069 चे अनुसरण करून ही कारवाई करण्यात आलीय. सार्वजनिक सुरक्षा, सुव्यवस्था आणि नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारकडून ही कारवाई केल्याचे समजतेय.

कळंगुट -बागा-वागातोर- हणजूण सारख्या किनारी भागात चालणाऱ्या नाइटक्लब, डान्सबार व मसाज पार्लरच्या नावाखाली अंमली पदार्थ, वेश्याव्यवसाय इतर बेकायदेशीर कृत्यांमध्ये वाढ होऊन यापरिसराचे नाव बदनाम होत आहे.

टाऊट्स (दलाल) लोक देशी पर्यटकांना सर्वकाही पुरवण्याचे आमिष दाखवून व नंतर त्यांना डान्सबार तसेच मसाज पार्लरमध्ये नेऊन त्यांना मारझोड करून लुबाडत असल्याचेही प्रकार घडत आहेत.

या विरोधात तेथील स्थानिकांनी वेळोवेळी आवाज उठवला होता. आता सरकारकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे किनारीभागात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात येत असल्याची माहिती समोर येतेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT