Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: गोवा पोलिसांची मोठी कारवाई! 2.59 कोटींच्या अमली पदार्थांसह बेकायदेशीर वास्तव्याप्रकरणी तीन स्वीडिश नागरिकांना अटक

Swedish Nationals Arrested Goa: गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अरंबोळ येथे मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. पथकाने तब्बल 2.59 कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त करुन तीन स्वीडिश नागरिकांना अटक केली.

Manish Jadhav

पणजी: गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अरंबोळ येथे मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. पथकाने तब्बल 2.59 कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त करुन तीन स्वीडिश नागरिकांना अटक केली. या अटकेमुळे गोव्यातील अमली पदार्थ तस्करीच्या आणखी एका रॅकेटचा पर्दाफाश झाला. सोमवारी (9 जून) सायंकाळी अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली.

तीन स्वीडिश नागरिकांना अटक

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या स्वीडिश नागरिकांची नावे आंद्रियास लोरेन्झो कॅलिक ( वय वर्ष 39), सामी अँटेरो हिल्डेन टांस्कानेन ( वय वर्ष, 36) आणि जोएल इमॅन्युएल कार्लस्ट्रॉम ( वय वर्ष 33) अशी आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे अमली पदार्थ जप्त केले, यामध्ये 24.8 ग्रॅम वजनाचे एलएसडी ड्रग्ज जप्त केले. एलएसडीचे 70 पॅकेट्स पोलिसांनी जप्त केले. याशिवाय, 49.3 ग्रॅम वजनाचे केटामाइन ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले. जप्त केलेल्या या अमली पदार्थांची अंदाजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत 2.59 कोटी रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बेकायदेशीर वास्तव्य

तसेच, अमली पदार्थांच्या तस्करीशिवाय हे तिन्ही आरोपी गोव्यात बेकायदेशीरपणे राहत असल्याचेही तपासात समोर आले. सामी अँटेरो हिल्डेन टांस्कानेन याच्याकडे कालबाह्य झालेला पासपोर्ट (Passport) मिळाला, जो त्याच्या बेकायदेशीर वास्तव्याचा पुरावा आहे. परदेशी नागरिकांचे बेकायदेशीर वास्तव्य आणि अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये त्यांचा सहभाग ही गोव्यासाठी एक मोठी चिंता आहे.

पोलिसांकडून गुन्ह्याची नोंद

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी एनडीपीएस (Narcotic Drugs and Psychotropic Substances) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. एनडीपीएस कायदा हा अमली पदार्थांची तस्करी आणि वापराशी संबंधित गंभीर गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षेची तरतूद करतो. पुढील तपास सुरु असून पोलीस या तस्करांच्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या अटकेमुळे गोव्यात कार्यरत असलेल्या मोठ्या अमली पदार्थ सिंडिकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.

गोव्यात अमली पदार्थांची वाढती तस्करी

तसेच, गोव्यामध्ये अमली पदार्थांची वाढती समस्या ही दीर्घकाळापासूनची एक गंभीर समस्या आहे. या अटकेमुळे पुन्हा एकदा हे सिद्ध झाले आहे की, गोवा (Goa) हे केवळ पर्यटन स्थळ नसून आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करांसाठी एक केंद्र बनले आहे. अशा मोठ्या कारवायांमुळे अमली पदार्थांच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यास मदत होते, परंतु या समस्येचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस, प्रशासन आणि स्थानिक नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नांची गरज आहे. याशिवाय, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि कडक कायद्याची अंमलबजावणी यातूनच गोव्याला या गंभीर विळख्यातून बाहेर काढणे शक्य होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT