Goa Crime: रागाच्या भरात कुऱ्हाडीने केला हल्ला, मृत्यूप्रकरणी न्यायालयाने ठरवले दोषी आणि लगेच केली सुटका; काय घडले नेमके? वाचा..

Goa Murder case: पुंडलिकनगर येथे १४ एप्रिल २०१९ रोजी पीडब्ल्युडी टाकीजवळ रात्री ८ वाजता बसप्पा व रामण्णा यांच्यात भांडण होऊन त्यांनी एकमेकाला मारहाण केली.
Goa Crime News
Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सहा वर्षांपूर्वी पर्वरीतील पुंडलिकनगर - पर्वरी येथील बसप्पा यमनप्पा हंसीकुट्टी (वय ४९) याच्या खूनप्रकरणी झालेल्या खटल्यावरील निवाड्यात म्हापसा उत्तर गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी रामण्णा बड्डी याला खुनाच्या आरोपाऐवजी सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवण्यात आले. त्याला अटक झाल्यापासून तो ६ महिने कोठडीत आहे, तीच त्याला शिक्षेची कैद देऊन सोडण्यात येत असल्याचे निवाड्यात न्यायालयाने म्हटले आहे.

पुंडलिकनगर येथे १४ एप्रिल २०१९ रोजी पीडब्ल्युडी टाकीजवळ रात्री ८ वाजता बसप्पा व रामण्णा यांच्यात भांडण होऊन त्यांनी एकमेकाला मारहाण केली. यावेळी रामण्णाने कुऱ्हाडीने बसप्पाच्या डोक्यावर हल्ला केला. या हल्ल्यात बसप्पाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला गोमेकॉत उपचारासाठी नेण्यात आले. तेथेच त्याचा मृत्यू झाला होता. संशयिताला अटक करून खुनाच्या आरोपाखाली न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

Goa Crime News
Goa Crime: हैदराबाद-गोवा कनेक्शन! तेलंगणा पोलिसांनी केला ड्रग्‍ज रॅकेटचा पर्दाफाश; गोवा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह

न्यायालयात खटल्यावरील सुनावणीवेळी ११ जणांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या. ज्या दिवशी ही घटना घडली, तेव्हा पीडब्ल्युडी टाकीजवळ असलेला एक सुरक्षारक्षक हा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता. त्याच्या साक्षीनुसार तसेच इतर पुराव्याच्या आधारे न्यायालयाने त्याला दोषी ठरवले. त्याने हा खून पूर्वनियोजित केला नाही, तर अचानक त्यांच्या भांडणातून झालेल्या मारहणीत झाला.

Goa Crime News
Mapusa Crime: अज्ञाताने डोक्यात घातला दगड, म्हापशात 75 वर्षीय वृद्ध व्यक्ती जखमी

त्यामुळे त्याला खुनाच्या आरोपाखाली दोषी ठरवण्याइतपत पुरावे नाहीत. मात्र, सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवले. अटकेपासून तो ६ वर्षे १ महिना व २१ दिवस तुरुंगात होता. त्यामुळे तो कोठडीत असलेला काळ हीच शिक्षा पुरेशी आहे असे नमूद करून त्याची सुटका केली आहे. बसप्पा याच्यावर हल्ला करण्यासाठी संशयिताने कोणतेही पूर्वनियोजन केले नव्हते. घटनास्थळी उपलब्ध असलेली कुऱ्हाड त्याने हल्ल्यासाठी उचलली होती. त्यामुळे यामधून खुनाचा गुन्हा सिद्ध होत नाही असे निरीक्षण न्यायालयाने केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com