Goa Cyber Crime  Dainik Gomantak
गोवा

Goa IPL Betting: कांदोळीत आयपीएल सट्टेबाजीचा पोलिसांकडून पर्दाफाश! गुजरातच्या 4 बुकींना रंगेहाथ पकडलं; 5 लाखांचा मुद्देमाल जप्त

IPL Betting Racket Goa : कांदोळी येथे आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या एका रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

म्हापसा: कांदोळी येथे आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या एका रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. कळंगुट पोलिसांनी कांदोळी येथील एका उच्चभ्रू अपार्टमेंटमध्ये छापा टाकून गुजरातच्या चार संशयितांना रंगेहात अटक केली. त्यांच्या ताब्यातून सुमारे ५ लाख रुपये किमतीचे मोबाईल व लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कांदोळी येथील एका अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये बेकायदेशीर क्रिकेट बेटिंग सुरू असल्याची विश्वासार्ह माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे २८ एप्रिल रोजी रात्री १०.३० ते ११.५५ या वेळेत पोलीस उपनिरीक्षक राजाराम बागकर आणि त्यांच्या पथकाने या फ्लॅटवर अचानक छापा टाकला.

या कारवाईत सोहेल सिकंदरभाई रउमा (वय २७, रा. मेहसाणा, गुजरात), भावेशकुमार जामाभाई रावल (वय ३१, रा. पाटण, गुजरात), आमिरखान अयुबखान पठाण (वय २८, रा. राधनपूर रोड, गुजरात) आणि कल्पेश भानाभाई माळी (वय २४, रा. बनासकांठा, गुजरात) या चार जणांना अटक करण्यात आली.दरम्यान, १६ एप्रिल रोजी रायबंदर येथील ‘कारेकर रेसिडेन्सी’ मधील एका व्हिलामध्ये आयपीएलवर सट्टा लावला जात होता. याप्रकरणी आठ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. या कारवाईनंतरही राज्यात आयपीएलवरील सट्ट्याचा प्रकार थांबलेला नाही.

५ लाखांचा मुद्देमाल

हे संशयित पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सुरू असलेल्या टी-२० आयपीएल सामन्यावर मोबाईल, लॅपटॉप आणि आयपॅडच्या माध्यमातून सट्टा स्वीकारत असताना रंगेहात पकडले गेले. पोलिसांनी घटनास्थळावरून ८ मोबाईल फोन, १ ॲपल आयपॅड आणि २ लॅपटॉप असा एकूण सुमारे ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राजाराम बागकर यांनी सरकारतर्फे तक्रार नोंदवून गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Effigy Plastic Use: नरकासुर प्रतिमांसाठी प्लास्टिकचा वापर; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या डोळ्यांवर पट्टी?

Smriti Mandhana Record: विराट-रोहितला जमलं नाही ते स्मृती मानधना करणार! टी-20 क्रिकेटमध्ये विश्वविक्रम रचण्याची संधी, फक्त इतक्या धावांची गरज

Gram Panchayat CCTV Plan: गोव्यातील प्रत्येक पंचायतीवर सीसीटीव्हीची नजर! तीन आठवड्यांत प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता

Karnataka Accident: कर्नाटकात प्रवाशांवर काळाचा घाला! बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक; 4 ठार, 14 जखमी

Land Compensation: जमीन मोबदल्यासाठी 7 वर्षांची प्रतीक्षा! 15 डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या; गोवा खंडपीठाचे निर्देश

SCROLL FOR NEXT