arrested Dainik Gomantak
गोवा

Cyber Crime: आंतरराष्ट्रीय 'जॉब स्कॅम'चा पर्दाफाश! गोवा पोलिसांची मोठी कारवाई, तीघांना ठोकल्या बेड्या

International Job Scam Exposed: गोवा पोलिसांच्या सायबर सेलने एका आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. मुख्य सूत्रधार हा चीन वशांचा कझाकी नागरिक तलानिती नुलाक्सी याला अटक करण्यात पोलिसांना यश आले.

Manish Jadhav

Goa Police Bust International Cyber Slavery Job Scam Key Accused Arrested

पणजी: गोवा पोलिसांच्या सायबर सेलने एका आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. मुख्य सूत्रधार हा चीन वशांचा कझाकी नागरिक तलानिती नुलाक्सी याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. तसेच, भारतीय नागरिक असलेल्या आदित्य रविचंद्रन आणि रुपनारायण गुप्ता यांच्याही मुसक्या आवळ्यात पोलिसांना यश आले.

पीडिताची म्यानमारमधून सुटका

दरम्यान, आंतरराष्ट्रीय सायबर स्लेवरी जॉब स्कॅममध्ये आडकलेल्या गोव्यातील (Goa) एका पीडिताची म्यानमारमधून सुटका करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांच्या सायबर सेलने पीडिताकडून माहिती घेत या प्रकरणाची चौकशी सुरु केली होती. थायलंडमधील एका कॉल सेंटरमध्ये नोकरी असल्याची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. या नोकरीसाठी तब्बल 60 रुपये वेतन मिळेल असे जाहिरातीत सांगण्यात आले होते. एजंटने या पीडित व्यक्तीला 14 जानेवारी रोजी थायलंड नेले.

हनी ट्रॅप आणि पैस गुंतवण्यास भाग पाडणे

त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला थांयलंडहून म्यानमारला बोटीमार्गे नेण्यात आले. तिथे त्याला कॉल सेंटरमध्ये नेऊन अमेरिकन लोकांना तरुणी असल्याचे मेसेज पाठवून पैसे गुंतवण्यास आणि हनी ट्रॅपमध्ये ओढण्यास भाग पाडण्यास सांगितले. मात्र भारतीय लष्कराला गोव्यातील या व्यक्तीची सुटका करण्यात यश आले.

पोलिस कारवाई

गोवा पोलिसांच्या (Goa Police) सायबर सेलने पीडिताची चौकशीनंतर तपास करत या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला. सायबर सेलचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता आणि अधीक्षक अक्षत कौशल यांच्या मार्गदर्शाखाली निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT