Goa Cyber Fraud Dainik Gomantak
गोवा

Goa Cyber Fraud: गोमंतकीयाला 38 लाखांना टोपी! शेअर बाजारातून चांगला परतावा मिळवून देण्याचं आमिष, महाराष्ट्रातील एकजण अटकेत

Goa Police Cyber Crime Action: गोवा पोलिसांच्या सायबर सेलने आज (13 मार्च) आणखी एका मोठ्या सायबर फ्रॉडचा भांडाफोड केला.

Manish Jadhav

Goa Police Bust 38 Lakh Cyber Fraud Fyers Trading Scam

पणजी: राज्यातील वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गोवा पोलिस धडक कारवाया करत आहेत. यातच आता, गोवा पोलिसांच्या सायबर सेलने आज (13 मार्च) आणखी एका मोठ्या सायबर फ्रॉडचा भांडाफोड केला. जुने गोवे येथील गोमंतकीयाला शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करुन तब्बल 38 लाखांना गंडा घालण्यात आला.

काय आहे नेमकं प्रकरण?

जुने गोवे येथील एका व्यक्तीला शेअर बाजारात गुंतकणूक (Investment) करण्यास प्रवृत्त करुन आरोपींनी तब्बल 38 लाखांना टोपी घातली. आरोपींनी या व्यक्तीला 'FYERS ट्रेडिंग ॲप'च्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास भाग पाडले. यासाठी त्यांनी त्याला 'R1' नावाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्येही सामील केले. मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून आरोपींनी पीडिताला 38 लाख वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले.

पीडिताने तक्रार दिली

दरम्यान, जेव्हा आपली फसवणूक झाली असल्याचे कळताच पीडिताने तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेतली. पीडिताने फसवणूकीची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांना चौकशीदरम्यान, पहिल्या स्तरावरील एका खातेदाराची ओळख पटली. महाराष्ट्रातील (Maharashtra) ऋतिक अनिल निकम (वय वर्ष, 23) याच्या बँक खात्यात तक्रारदाराने तब्बल 2 लाख पाठवले होते. त्याला गुरुवारी (13 मार्च) सायबर क्राईमच्या पथकाने अटक केली. विशेष म्हणजे, ऋतिकचे बँक खाते देशभरातील 22 इतर आर्थिक फसवणूक प्रकरणांशी जोडलेले असून तब्बल 11.5 कोटींची फेराफेरी झाल्याचे कळते आहे.

इतर आरोपींचा शोध सुरु

गोवा सायबर पोलिसांकडून इतर आरोपींचा शोध घेतला जात असून, पुढील तपास PI दीपक पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. दरम्यान, गोवा पोलिसांनी नागरिकांना ऑनलाइन गुंतवणुकीसंदर्भात सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa University Election: विद्यापीठ निवडणूक अचानक रद्द, 15 मिनिटे आधी पत्रक; अभाविप ,एनएसयूआयकडून धरणे आंदोलन

Horoscope: बुधवारी तुमच्या राशीत काय? मेष-मिथुनला पार्टनरकडून खास भेट, कर्कचे जुने टेन्शन दूर होणार

Goa Assembly Winter Session 2026: विधानसभेचे हिवाळी अधिवेशन हडफडे अग्निकांडामुळे तापणार? 12 ते 16 जानेवारीपर्यंत चालणार कामकाज

Goa Nightclub Fire: लुथरा बंधू आज गोव्यात, 48 तासांचा ट्रान्झिट रिमांड; गोवा पोलिसांनी दिल्लीत घेतला ताबा

Canacona Missing Boat: मच्छीमार बोट बेपत्ता, तरीही सरकार सुस्त! संतापलेल्या मच्छीमारांनी रोखला मडगाव-कारवार हायवे VIDEO

SCROLL FOR NEXT