Goa Cyber Fraud: गोव्यात सायबर चोरट्यांकडून तब्बल 51 जणांना गंडा; गत 8 महिन्यातील आकडेवारी

तीन वर्षात एकूण 179 गुन्ह्यांची नोंद; कोट्यवधींची फसवणूक
Cyber Fraud Rises in Goa
Cyber Fraud Rises in Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

Cyber Fraud Cases Rises in Goa: गोव्यात दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारीत वाढ होत चालली आहे. सायबर गुन्ह्यांच्या विविध प्रकारांतून सर्वसामान्यांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक होत आहे. गोव्यात सन 2021 पासून सायबर गुन्ह्याची 179 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यातील 99 प्रकरणे तोतयागिरीद्वारे फसवणुकीची आहेत.

तोतयागिरीच्या प्रकरणांमध्ये बँकांची फसवणूक झाल्याच्या घटनांसह अनेक प्रकरणे आहेत. अलीकडील दोन घटनांचा विचार करायचा तर तोतयागिरी करणाऱ्यांकडून बँक व्यवस्थापकांना फसवले गेले आहे.

अगदी ताज्या घटनेत एका राष्ट्रीयीकृत कंपनीचा संचालक असल्याचे भासवत एकाने व्यवस्थापकाला दोन व्यवहारांमध्ये बँकेच्या खात्यातून 16 लाख रुपये हस्तांतरित करण्यास प्रवृत्त केले होते.

Cyber Fraud Rises in Goa
Goa Dog Bite Cases: गोव्यात कुत्र्यापासून सावध राहा! 95 हजार 902 जणांना चावा

सायबर क्राईमच्या पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांनी सांगितले की, आयटी कायद्याच्या कलम 66 सी अंतर्गत तोतयागिरी (संगणक उपकरणांचा वापर करून) फसवणूक करणे अशीच प्रकरणे सर्वाधिक नोंदवली गेली आहेत. ज्याचे बारकाईने पालन केले जाते.

फेक सोशल मीडिया अकाऊंट काढून दुसऱ्याची ओळख घेऊन फसवणूक केलेल्या 48 घटनांची नोंद झाली आहे.

फसवणूक करणारे भामटे सायबर फसवणुकीचे नवनवीन फंडे शोधत असतात. महिलांचीही मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. 2021 मध्ये सायबर गुन्ह्यांची संख्या 38 होती ती 2022 मध्ये 90 वर गेली आहे. चाईल्ड पोर्नोग्राफीसारख्या गुन्ह्यांवर लक्ष ठेवले जात असते.

एजन्सी अशा प्रकारची माहिती पोलिसांना कळवतात, अशा अनेक पोर्टल, संकेतस्थळांवर केंद्रीय गृह मंत्रालयाचे लक्ष असते.

Cyber Fraud Rises in Goa
Siolim Car Accident: मारणा-शिवोलीत भरधाव कार-मोपेड स्कुटरची समोरासमोर धडक; दोन्ही ड्रायव्हर गंभीर जखमी

एनसीआरपी आणि सीपआरजीआर ही पोर्टल्स अश्लील संकेतस्थळे पाहणाऱ्यांची माहिती संग्रहीत करत असतात, त्यामुळे त्यावर कारवाई करणारी यंत्रणा कार्यरत आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, नुकत्याच एका घटनेत सोशल मीडियातील ओळख चोरी करून उत्तर प्रदेशातील 42 वर्षीय व्यापारी नितीन कुमारने केंद्रीय कायदा मंत्रालय कार्यालयातील असल्याचा दावा करून मुख्यमंत्र्यांशी त्यांच्या वैयक्तिक क्रमांकावर संपर्क साधला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे करता येईल...

  • सोशल मीडियातून आलेली कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापुर्वी शहानिशा करावी

  • वारंवार डीपी बदलू नये

  • सोशल मीडियाचा वापर सावधगिरीने करावा

  • काही संशय़ास्पद वाटल्यास सायबर पोलिसांशी संपर्क साधावा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com