Arrest Dainik Gomantak
गोवा

Goa Police: मांद्रेत उत्तर कोरिया, युगांडाच्या नागरिकांची घुसखोरी, पोलिसांनी दिला दणका

Uganda and North Korea Citizens Arrest In Goa: मांद्रे पोलिसांनी आज (10 ऑक्टोबर) बेकायदेशीररित्या भारतात राहणाऱ्या तीन परदेशी नागरिकांना अटक घेतले.

Manish Jadhav

राज्यात गेल्या काही दिवसांत पोलिसांच्या धडक कारवाया वाढल्या आहेत. यातच, आज (10 ऑक्टोबर) मांद्रे पोलिसांनी बेकायदेशीररित्या भारतात राहणाऱ्या तीन परदेशी नागरिकांना ताब्यात घेवून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांपैकी दोन जण युगांडाचे असून एकजण उत्तर कोरियाचा आहे.

दरम्यान, पेडणेचे एसडीपीओ जिवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी मांद्रे पोलिसांबरोबर एक विशेष मोहीम राबवली, ज्यातर्गंत या नागरिकांना ताब्यात घेण्यात आले. नबड्डा बेट्टी (वय वर्ष 44), आणि वासुवा बेट्टी (वय- 25 वर्षे) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या युगांडाच्या नागरिकांची नावे आहेत. तर एन एस कमला डी/ओ लियानचुंगा वनलालमुनाई (वय- 38 वर्षे) असे उत्तर कोरियाच्या (North Korea) नागरिकाचे नाव आहे.

पकडलेल्या तिन्ही नागरिकांच्या (Citizens) कागदपत्रांची जेव्हा तपासणी करण्यात आली तेव्हा ते बेकायदेशीरित्या देशात राहत असल्याचे आढळून आले. फॉरेनर ऑर्डर 1948 आणि फॉरेनर्स ऍक्ट 1946 च्या तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी या तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. उत्तर गोव्याचे एसपी उत्तर अक्षत कौशल यांच्या देखरेखीखाली पुढील तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी,उद्धवकडून फडणवीसांना आनाजीपंतांची उपमा

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

SCROLL FOR NEXT