Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी झारखंडच्या तरुणाला अटक, गोवा पोलिसांची कारवाई

Minor Sexual Assault Case: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या मुसक्या आवळण्यात गोवा पोलिसांना यश आले आहे.

Manish Jadhav

Minor Sexual Assault Case: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या मुसक्या आवळण्यात गोवा पोलिसांना यश आले आहे. सुशान केवल नायक असे या आरोपीचे नाव आहे. सुशान हा मूळचा झारखंडचा रहिवासी आहे.

14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

मिळालेल्या माहितीनुसार, कुंकळ्ळीमध्ये एका 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी बाल संरक्षण कायदा आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्ह्याची नोंद केली होती. आता या प्रकरणी पोलिसांनी सुशानला अटक केली.

मुलीला घेऊन झारखंड गाठले

संशयित सुशान सध्या सारझोरा येथे भाड्याच्या घरात राहत होता. याचदरम्यान तो मुलीला घेऊन झारखंड (Jharkhand)ला गेला होता. काही दिवसांनी तो तिला घेऊन गोव्यात परतला. ही धक्कादायक घटना 2 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत घडली. या कालावधीत त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यादरम्यान ती गर्भवतीही राहिली.

पालकांची तक्रार

पीडित अल्पवयीन मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी संशयित सुशानला ताब्यात घेत चौकशीअंती रितसर अटक केली. या प्रकरणी कुंकळ्ळी पोलीस निरीक्षक ग्रॅसिअस यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tesla Roadster Flying Car: रस्त्यावर धावणारी कार आता हवेतही उडणार! हेलिकॉप्टरसारखी लँडिंग, थ्रस्टरच्या मदतीने भन्नाट स्टंट Watch Video

Goa Land Zoning: गोव्यातील सेर्नाभाटी, कोलव्यातील 12.74 लाख चौ. मीटर जमीन 'अविकासयोग्य'; सरकारची मंजुरी

Crime News: भरदिवसा सुरीने हल्ला; सूरज कसबेचा जामीन अर्ज फेटाळला, न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

IND vs WI 5th T20: भारत-वेस्ट इंडिजमध्ये मालिकेसाठी आरपारची लढाई! पाचव्या टी-20 साठी प्लेइंग-11 मध्ये कोणाला मिळणार संधी, कोणाचा पत्ता कट होणार?

Tarun Tejpal Case: तेजपालच्या याचिकांवरील सुनावणी 3 नोव्हेंबरला; जन्मठेपेच्या मागणीवरही लक्ष

SCROLL FOR NEXT