Goa Drug Case Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: पर्रा येथे 1.65 कोटींचे ड्रग्ज जप्त! विद्यार्थी व्हिसावर राहणाऱ्या नायजेरियन नागरिकाला अटक

Nigerian Drug Arrest Goa: अबासिली २८ एप्रिल २०२५ पासून गोव्यात विद्यार्थी व्हिसावर राहत होता. तेलंगण अंमलीपदार्थ विरोधी विभागाकडून मिळालेल्या माहितीनंतर, गुन्हे शाखेने ही कारवाई केली.

Sameer Panditrao

पणजी: तेलंगणच्या पोलिसांनी गोव्यातील अमलीपदार्थविषयक व्यवहारांची पोलखोल करणे सुरू केले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने नायजेरियन राष्ट्रीय एननायेलुगो अबासिली (वय २३) याला काल रात्री पर्रा येथील आराडीमधील भाड्याच्या घरातून अटक केली. त्याच्याकडून अंदाजे १.६५ कोटी रुपयांचा (१ कोटी ६४ लाख ९४ हजार ५० रुपयांचा) अमलीपदार्थ जप्त करण्यात आला.

यामध्ये २,४०० एक्स्टसी गोळ्या (१.१२३ ग्रॅम), ६० ग्रॅम कोकेन, ९९ ग्रॅम ब्राऊन हेरॉइन, १९ ग्रॅम क्रिस्टल एमडीएमए आणि ७०,००० रुपयांची रोख रक्कम यांचा समावेश आहे. अबासिली २८ एप्रिल २०२५ पासून गोव्यात विद्यार्थी व्हिसावर राहत होता. तेलंगण अंमलीपदार्थ विरोधी विभागाकडून मिळालेल्या माहितीनंतर, गुन्हे शाखेने ही कारवाई केली.

दरम्यान, गुन्हे शाखेचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी माहिती दिली की, २०२५ च्या पहिल्या साडेचार महिन्यांत गोवा पोलिसांनी सुमारे ६८.३९ कोटी रुपयांचे अमलीपदार्थ जप्त केले असून एकूण ७४ जणांना अटक करण्यात आली आहे. भारतात कार्यरत असलेल्या दोन आंतरराष्ट्रीय अंमलीपदार्थ तस्करीच्या टोळ्यांचा भांडाफोडही गुन्हे शाखेने केला आहे.

त्यांनी नागरिकांना आणि घरमालकांना कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास पोलिसांना किंवा थेट त्यांना कळवण्याचे आवाहन केले असून माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे आश्वासन दिले.

बेकायदेशीरपणे राहणारे दोन परदेशी नागरिक अटकेत

म्हापसा पोलिसांनी पर्रा येथे शुक्रवारी (९ मे) सायंकाळी बेकायदेशीरपणे राहणाऱ्या दोन परदेशी नागरिकांना अटक केली. चिगोझी एजिकियल (वय २४, नायजेरियन) आणि इस्माईल बाबा (वय २९, आयव्हरी कोस्ट) हे दोघे पर्रा, बार्देश येथे व्हिसाविना व मुदतबाह्य पासपोर्टवर भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करत होते. या दोघांना पोलिस उपनिरीक्षक बाबलो परब यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अटक केली. ही कारवाई पोलिस निरीक्षक निखिल पळेकर, उपविभागीय अधिकारी विल्सन डिसोझा आणि पोलिस अधीक्षक (उत्तर) राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT