Goa Gelatin Explosion Case Dainik Gomantak
गोवा

Goa Gelatin Explode: अन्सोळे-भिरोंडा जिलेटीन स्फोट! काजू फार्म मालकाला अटक

Goa Gelatin Explosion Case: अन्सोळे-भिरोंडा सत्तरी येथे काल (सोमवारी) रात्री 8:30 च्या सुमारास एक मोठा स्फोट होऊन येथील परिसर हादरला.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Gelatin Explosion Case

अन्सोळे-भिरोंडा सत्तरी येथे काल (सोमवारी) रात्री 8:30 च्या सुमारास एक मोठा स्फोट होऊन येथील परिसर हादरला. हा स्फोट एका खासगी मालमतेतील पंप- हाऊसमध्ये झाला. या प्रकरणी वाळपई पोलिसांनी नासीर हुसेन जमादार (53, रा. नुहा कॉलनी नागवे) याला रात्री अटक केली.

परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्फोटानंतर परिसरात वास (दुर्गंधी) पसरली आहे. त्यामुळे हे जिलेटीन आहे की, आणखीन काही याचा शोध पोलिस घेत आहेत.

या स्फोट एवढा भयंकर होता की, त्याचा आवाज सुमारे पाच कि. मी. अंतरावर पोहचला. त्याचबरोबर एक किमी परिसरातील घरांच्या भिंती, तावदाने, छपरांचे, खिडक्या दरवाजे आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर माहिती अशी की, हुसेन यांनी आपल्या मालमत्तेतील गोदामात अवैधरित्या स्फोटक पदार्थ साठवून ठेवले होते आणि त्याचा स्फोट झाल्याने गोदाम, मुख्य गेट व संरक्षक भिंत तसेच परिसरातील घरांचे नुकसान झाले.

तसेच संशयित सहा महिन्यांपूर्वी बेकायदा ढिगारा खाणीचा व्यवसाय चालवत होता आणि यासाठी स्फोटके खरेदी करून ती साठवून ठेवल्याचे उघडकीस आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT