gambling zone Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: गोव्यात तीन जुगार अड्ड्यांवर कारवाई; सहा संशयितांना अटक

संशयितांकडून 2 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Police Raid On Gambling: स्थानिक पोलिसांनी आणि क्राईम ब्रांचच्या शाखेने गोव्यातील 3 ठिकाणी जुगार अड्ड्यांवर कारवाई केली आहे. स्थानिक पोलिसांनी साखळीच्या कारापूर तिस्क येथे आणि कळंगुटच्या मार्केटमधील एका दुकानात व क्राईम ब्रांचच्या शाखेने घोगळ - मडगाव येथे कारवाई केली.

या कारवाईत तिन्ही ठिकांणाहून सहा संशयितांना अटक केली तर त्यांच्याकडून सुमारे 2 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयितांच्या विरोधात गोवा दमण दीव जुगार कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्राईम ब्रांचला मिळालेल्या माहितीच्या आधारे घोगळ - मडगाव येथे ‘रोलेट कॅसिनो’ प्रकारातील जुगारअड्ड्यावर छापा टाकला. या छाप्यात चार संशयितांना अटक करण्यात आली. तसेच त्यांच्याकडून 1 लाख 48 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तर दुसरी कारवाई डिचोली पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे साखळीच्या कारापूर तिस्क भागात एका खोलीत केली. बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी त्या खोलीवर छापा टाकून जुगार खेळणाऱ्यांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल उल्हास बळवे यांनी रितसर तक्रार दिली होती.

या छाप्यात बुलू ऋषिकेश परिदा या संशयिताला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 1 हजार 50 रुपयांच्या रोकडीसह अन्य साहित्य जप्त करण्यात आले. रात्री उशिरा त्याला जामिनावर सोडण्यात आले.

तिसऱ्या कारवाईत कळंगुट मार्केटमध्ये एका दुकानात रोलेट कॅसिनो जुगारअड्ड्यावर बुधवारी सायंकाळी कळंगुट पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात संशयित अजय कुमार (32, रा. पर्वरी, मूळ उत्तर प्रदेश) याला अटक करण्यात आली. संशयिताकडून 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chit Celebration Ban: IPL मध्ये 'पर्ची सेलिब्रेशन'वरून मोठा राडा! माजी क्रिकेटपटू भडकला, थेट 'BCCI' कडे केली 'ही' मोठी मागणी

Viral video: विदेशी तरूणीनं पहिल्यांदाच खाल्लं भारतीय 'पान'; रिएक्शन पाहून नेटीझन्सना हसू आवरेना, व्हिडिओ व्हायरल!

NEET Paper Leak: आता उघडणार सर्व गुपितं! बॉटनी प्रोफेसर मनीषा मंधारेला 14 दिवसांची 'CBI' कोठडी; मथुरेतून झाली होती अटक

Goa Drowning Death: बुडून मृत्यू की घातपात? कुळे येथील दूधसागर नदीत मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू

Goa House Fire: मयते-अस्नोडा येथे भीषण आग; घराची स्टोअर रूम जळून खाक, 3 लाखांचे सामान भस्मसात

SCROLL FOR NEXT