Goa Police Dainik Gomantak
गोवा

50 हजार कोटींचा घोटळा! गोवा सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप करणारा Youtuber अडचणीत; पोलिसांची हरियाणा, दिल्लीत धडक

Goa Police: गोवा सरकारने केलेल्या पैशांच्या उधळपट्टीवर भाष्य करणारे अनेक व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

Pramod Yadav

पणजी: गोवा सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारा Youtuber अडचणीत सापडला आहे. गोवा पोलिसांची गुन्हे शाखा सरकारची बदनामी केल्याबाबत या प्रकरणाचा तपास घेत आहे. गोवा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी हरियाणासह दिल्लीत धडक दिली. Youtuber ने त्याच्या व्हिडिओत झुवारी जमीनीच्या 50 हजार कोटींचा घोटळ्याचा उल्लेख केला आहे.

गोवा सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप करुन बदनामीकारक व्हिडिओ तयार करत प्रसिद्ध केल्याप्रकरणी पोलिसांची गुन्हे शाखा तपास करत आहे. व्हिडिओसाठी जबाबदार असणाऱ्या लोकांच्या चौकशीसाठी पोलिसांनी हरियाणानंतर दिल्लीला भेट दिली.

रोहित उपाध्याय या Youtuber ने गोवा सरकारच्या विरोधात अनेक व्हिडिओ प्रसिद्ध केले आहेत. अलिकडेच त्याने विधानसभेत गाजलेला झुआरी जमीन घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला. यात त्याने सरकारच्या ५० हजार कोटींच्या घोटाळ्याचा उल्लेख केला आहे. या व्हिडिओत त्याने आमदार विजय सरदेसाई यांची प्रतिक्रिया देखील जोडल्या आहेत.

येथे पाहा व्हिडिओ

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवा सरकारने केलेल्या पैशांच्या उधळपट्टीवर भाष्य करणारे अनेक व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. राज्य सरकारची चुकीची धोरणं आणि कंत्राटांना दिलेली मुदतवाढ यामुळे भ्रष्टाचाराला खतपाणी देण्याचे काम सरकारने केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सरकार या बदनामी विरोधात सक्त झाल्याचे दिसून येते.

विजय सरदेसाईंनी केली टीका

गोव्यातील भ्रष्ट सरकारकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या काही इन्फ्लुएन्सर लोकांना पकडण्यासाठी गोवा सरकारने गोवा पोलीस हरियाणाला पाठवलेत. ५०,००० कोटींचे झुआरी जमिनीसारखे अवाढव्य घोटाळे होत आहेत. खरच तुम्हाला गोव्याबद्दल प्रेम असेल तर तुम्ही राज्याचे 30,000 कोटींचे संपूर्ण कर्ज चुकते करुन टीकाकारांना गप्प करू शकता.

पण तुम्ही ते करणार नाही कारण तुम्ही ते आश्रयदाते आहात ज्यांनी आमचे सुंदर राज्याचे तुकडे करून गोमंतकीयांच्या खर्चाने बाहेरच्या लोकांना विक्रीसाठी ठेवले आहे. गोव्याला उद्ध्वस्त केले जात आहे, अशा शब्दात विजय सरदेसाईंनी सरकारवर टीका केली.

कोण आहे रोहित उपाध्याय?

रोहित उपाध्याय एक प्रसिद्ध Youtuber आहे. प्रामुख्याने हिंदीतून व्हिडिओ करणारे रोहितच्या चॅनलला साडे सात लाख सबस्कार्यबर्स आहेत. रोहितने गोव्यातील अनेक विषयांवर भाष्य करणारे व्हिडिओ प्रसिद्ध केले आहेत.

गोवा स्कॅम फाईल्सच्या नावाने त्याने राज्यातील अनेक चर्चित मुद्यावर सविस्तर व्हिडिओ केल्यात. यात त्याने राज्यातील विविध भ्रष्टाचारावर भाष्य केले आहे. याशिवाय रोहितने इतर अनेक विषयावर सविस्तर विश्लेषण करणारे व्हिडिओ प्रसिद्ध केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT