कळंगुट बीचवर दलालांनी दिल्लीच्या युवकाचा खून का केला? संशयितांना चार दिवासांचा रिमांड

Goa Murder Case: तिघांना न्यायालयासमोर हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कळंगुट बीचवर दलालांनी दिल्लीच्या युवकाचा खून का केला? संशयितांना चार दिवासांचा रिमांड
Goa Murder CaseDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: गोव्यातील कळंगुट येथे दिल्लीच्या युवकाचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर शनिवारी (दि. १० ऑगस्ट) युवकाचा मृतदेह आढळला. शवविच्छेदन अहवालानंतर त्याचा खून झाल्याचे समोर आले. पोलिसांनी याप्रकरणी तीन दलालांना अटक केली असून, त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हर्ष तन्वर (२५, दिल्ली) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी साहिल उर्फ विशाल कुमार भटनागर (रा. कळंगुट, मूळ रा. उत्तराखंड), नूर महम्मद खान (रा. पर्रा) आणि सुनील विश्वकर्मा (रा. मूळ नेपाळ) यांना अटक केलीय. तिघांना न्यायालयासमोर हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हर्षचा मृतदेह कळंगुट किनाऱ्यावर आढळल्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह गोमेकॉत दाखल करण्यात आला होता. शवविच्छेदनानंतर त्याचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

सुरीने हल्ला करुन त्याचा खून करण्यात आला. त्याच्या शरीरावर सुरीचे घाव आढळून आले आहेत. कळंगुट पोलिसांनी या प्रकरणी खूनाचा गुन्हो नोंद करुन तीन दलालांना अटक केली.

कळंगुट बीचवर दलालांनी दिल्लीच्या युवकाचा खून का केला? संशयितांना चार दिवासांचा रिमांड
कोकणी लोकांबाबत वक्तव्य भोवलं! नितेश राणेंनी भरला दम अन् मुनव्वर फारुकीने मागितली माफी

हर्ष तन्वरचा खून का केला?

हर्ष शुक्रवारी रात्री कळंगुट किनारी एकटाच बसला होता. तीन संशयित घटनास्थळी आले व त्यांनी त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. चोरीच्या उद्देशाने आलेल्या दलालांनी हर्षवर सुरी हल्ला करत जखमी केले.

मृत हर्षचा मृतदेह पाण्याबरोबर वाहत गेला. जीव रक्षकांनी शनिवारी सकाळी मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवला असता हर्षचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Nashik Live In Partner Murder Case
41 year old man found dead inside car in Calangute
Goa Uncle Murder Case
Crime News
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com