Goa Police Arrests 11 touts at Calangute  Dainik Gomantak
गोवा

Goa Police: कळंगुटात पोलिसांचा दलालांना पुन्हा दणका; 11 जणांच्या आवळल्या मुसक्या

मोहीम सुरुच राहणार. बहुतेक दलाल जुनेच

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Police: कळंगुट-बागा परिसरातील 11 दलालांवर कळंगुट पोलिसांनी कारवाई केली. पर्यटकांना आमिष दाखवून त्यांची फसवणूक करण्याचे प्रकार कळंगुट-बागा येथील किनाऱ्यांवर होत असतात.

त्यामुळे गोवा पोलिसांकडून दलालांवर कारवाईच्या मोहिमा केल्या जात असतात. तशाच पद्धतीने रविवारी कळंगुट पोलिसांनी ही कारवाई केली. पर्यटकांना सुरक्षित वातावरण मिळावे, या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली.

कळंगुट पोलिसांनी रविवारी या मोहिमेत 11 दलालांना ताब्यात घेतले. यातील अनेकांवर एकाहून अनेकदा कारवाईला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे त्यांना 50,000 रूपये दंड करण्यात आला.

कळंगुट परिसरात पर्यटकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी अशा मोहिमा नेहमी केल्या जातील, असे पोलिसांनी सांगितले. कळंगुट पोलिसांनी गतवर्षात 400 दलालांवर कारवाई केली होती. तर यावर्षी आत्तापर्यंत 650 दलालांवर कारवाई करण्यात आली आहे.

कळंगुट पोलिस स्टेशनतर्फे पर्यटकांसाठी आणि स्थानिकांसाठी देखील मदतीसाठी तत्पर आहे, असे पोलिस स्टेशनच्यावतीने सांगण्यात आले आहे.

दरम्यान, पर्यटन संचालकांकडूनही या दलालांवर 5000 रूपये दंडाची कारवाई करण्यात आली. तर दुसऱ्यांदा हा गुन्हा करणाऱ्यांना 20,000 रूपये दंड ठोठावण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tilak Varma: आशिया कपमध्ये कमाल, आता तिलक वर्मा करणार कॅप्टन्सी! टीमची झाली घोषणा; पाहा संपूर्ण संघ

BJP Rath Yatra Goa: भाजपतर्फे 25 डिसेंबरपर्यंत रथयात्रा, पदयात्रा; मतदारसंघनिहाय मेळावे होणार, स्वदेशीचा नारा करणार बुलंद

PM Surya Ghar Scheme:'पीएम सूर्य घर मुफ्‍त बिजली'च्या जागृतीला चालना, उत्तर गोवा जिल्हा समन्वय समितीच्‍या बैठकीत निर्णय

Pernem: शेतकऱ्यांसाठी घातक असलेला कायदा बदला, कुळ मुंडकार संघर्ष समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Mhaje Ghar: 'माझे घर'चे अर्ज सोमवारपासून उपलब्ध; योजना सामान्यांपर्यंत पोहोचवा, CM प्रमोद सावंतांच्या अधिकाऱ्यांना सूचना

SCROLL FOR NEXT