Goa plastic free initiative Dainik Gomatnak
गोवा

Goa Plastic Ban: गोव्यात प्लास्टिकवापराविरुद्ध धडक मोहीम! 5058 छापे, 7.86 लाखांचा दंड वसूल; केंद्राच्या सूचना जारी

Goa plastic ban fine: केंद्र सरकारने जारी केलेल्‍या निर्देशांची राज्‍यात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्‍याचे निर्देश केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने गोव्‍यासह सर्वच राज्‍यांच्‍या ‘पीसीबीं’ना जारी केले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्‍य प्रदूषण नियंत्रण मंडळ (पीसीबी), नगरपालिका आणि पंचायतींनी चार वर्षांत ५,०५८ ठिकाणी छापे टाकत प्‍लास्‍टिकमुक्तीसंदर्भातील निर्देशांचे पालन न करणाऱ्यांकडून सुमारे ७.८६ लाखांचा दंड वसूल केलेला आहे. दरम्‍यान, प्‍लास्‍टिकमुक्तीसंदर्भातील केंद्र सरकारने जारी केलेल्‍या निर्देशांची राज्‍यात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्‍याचे निर्देश केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने गोव्‍यासह सर्वच राज्‍यांच्‍या ‘पीसीबीं’ना जारी केले आहेत.

डिसेंबर २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ‘पीसीबी’ने विशेष पथके तयार करावी आणि महिन्यातून किमान चार दिवस नगरविकास खात्‍याच्‍या पथकांसमवेत संयुक्तपणे तपासणी करावी, तपासणी दरम्‍यान पोलिस पथक सोबत घ्‍यावे, राज्यस्तरीय मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन करावा, रस्त्यावरील विक्रेते, दुकाने, घाऊक बाजार, आंतरराज्यीय सीमा, औद्योगिक आस्‍थापने, बस डेपो, रेल्वे स्थानके, विमानतळे आणि इतर गर्दीच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून तपासणी करणे,

या मोहिमेतील अधिकाऱ्यांची अनुपालन देखरेख पोर्टलवर नोंदणी करणे, तपासणी अहवाल पोर्टलवर दाखल करणे, तपासणी अहवालात प्‍लास्‍टिक वस्तूंचे पुरवठादार, कच्च्या मालाचे पुरवठादार आणि उत्पादकांची माहिती पोर्टलवर समाविष्ट करणे, कारवाईची माहिती पाहणीसंदर्भात केलेल्‍या तक्रार ॲपवर टाकणे, संबंधित ॲपच्‍या वापराबाबत जागृती करणे, तक्रार अॅपवर प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींचे मुदतीत निराकरण आदींसारखे निर्देश केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जारी केले असून, फेब्रुवारी २०२६ पर्यंत दर महिन्याच्या अखेरीस केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्‍याच्‍या सूचनाही जारी केल्‍या आहेत.

प्‍लास्‍टिकमुक्तीसंदर्भातील छापे

कार्यालय वर्ष छापे कचरा (किलोत) दंड

पीसीबी २०२२ १७२ ११४ १.०७ लाख

२०२३ ५१ २७७.२ २.७८ लाख

२०२४ २४ ८६ १.१५ लाख

पालिका २०२२ २९२ १२६.५ ९१ हजार

२०२३ २१६ ८७.४ १.०७ लाख

२०२४ ११ ६.०५ ७,४०० रुपये

पंचायती २०२२ ६५६ २८.८३२ १६,६०० रुपये

२०२३ २,४३४ १८८.७९ ५५,९०० रुपये

२०२४ १,२०२ २१.०८७ ७,९०० रुपये

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bengaluru Crime: बंगळुरुमध्ये माणुसकीला काळिमा! इन्स्टाग्रामवर मैत्री, नंतर प्रेमासाठी दबाव अन् भररस्त्यात तरुणीवर हल्ला; CCTV मुळे नराधम गजाआड

Ishan Kishan Fastest Century: ईशान किशनचा 'विराट' अवतार! 33 चेंडूंत ठोकलं शतक; टीम इंडियात पुनरागमन करताच रचला इतिहास VIDEO

Goa ZP Election Results: "एकत्र आल्याशिवाय भाजपला हरवणं अशक्य", आपची 'निराशाजनक' हार; पालेकरांनी मांडले विश्लेषण

गोलमाल है भाई..! गोव्यातील नव्या आमदाराने सत्तेतील नेत्याकडून घेतली 10 लाखांची लाच; नेत्याची बढती झाली अन् पितळ उघडं पडलं, भाजप नेत्यानं सांगितला किस्सा

पुण्यातून सायकलवरून गाठलं गोवा! ३ युवकांचा ‘पर्यावरणासह आरोग्य सांभाळा’चा संदेश; कन्याकुमारी गाठण्याचे ‘लक्ष्य’

SCROLL FOR NEXT