Plastic Ban: प्लास्टिक बंदीचे वाजले तीनतेरा; पिशव्यांचा होतोय बेधडक वापर, ग्राहक-विक्रेते दोघेही जबाबदार

Bicholim plastic bag violation: ‘सिंगल यूज’ प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर कायद्याने बंदी असतानाही डिचोली बाजारात या पिशव्यांचा बिनधास्त वापर होत आहे.
Bicholim plastic bag violation
Bicholim plastic bag violationDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: ‘सिंगल यूज’ प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर कायद्याने बंदी असतानाही डिचोली बाजारात या पिशव्यांचा बिनधास्त वापर होत आहे.

विशेषतः मासळी बाजारात या पिशव्या सर्रासपणे वापरल्या जातात. दोन वर्षांपूर्वी लागू झालेल्या बंदीच्या निर्णयानंतर सुरवातीला कारवाईमुळे काही प्रमाणात नियंत्रण आले होते. परंतु आता पुन्हा बाजार प्लास्टिकच्या विळख्यात अडकला आहे.

नवनिर्वाचित नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकर यांनी शहर ‘प्लास्टिकमुक्त’ करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी कोणती ठोस पावले उचलली जातात, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

Bicholim plastic bag violation
Goa: दिवाडीत ‘कोटीतीर्थ कॉरिडॉर’! एक हजार मंदिरांचे प्रातिनिधिक स्मारक; संग्रहालयही उभारणार, मुख्यमंत्र्यांची माहिती

पालिका, मामलेदार व पोलिसांच्या मदतीने प्लास्टिकविरोधी मोहिमेदरम्यान काही विक्रेत्यांकडून पिशव्या जप्त करून दंडात्मक कारवाईही झाली होती. त्यामुळे काही दिवस बाजारात या पिशव्या दिसेनाशा झाल्या होत्या.

मात्र हळूहळू कारवाई मंदावली आणि पुन्हा पिशव्यांचा वापर सुरू झाला. फळभाज्या, मासळी विक्रेत्यांकडे या पिशव्या सहज उपलब्ध आहेत. दुसरीकडे घाऊक विक्रेते पद्धतशीरपणे पिशव्या बाजारात पोहोचवत असल्याचे समोर आले आहे.

Bicholim plastic bag violation
ED Raid Goa: चड्डी-बनियनवर आसगावात फिरणारा अचानक झाला 'गोल्ड मॅन', 1,200 कोटीच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी 'ईडी'ची कारवाई; लक्झरी गाड्या जप्त

ग्राहक पिशव्या आणत नसल्‍याने अडचण

ग्राहक स्वतःसोबत बाजारात पिशव्या घेऊन जात नसल्‍याने विक्रेत्यांना प्‍लास्‍टिकच्‍या सिंगल यूज पिशव्या द्याव्या लागतात. महागड्या पिशव्या मोफत देणे त्यांना परवडत नाही. त्यामुळे प्लास्टिकवरच भर दिला जातो.

लहान विक्रेत्यांवरच कारवाई केली जाते, ही स्थानिकांची तक्रार आहे. पुरवठादार व ग्राहकांवरही दंडात्मक कारवाई झाल्यास बंदी प्रभावी होऊ शकते, असे जागृत नागरिकांचे मत आहे.

बंदीसाठी उपाय

  • विक्रेत्यांबरोबरच ग्राहकांवर दंड

  • घाऊक पुरवठादारांवर कारवाई

  • स्वतःच्या पिशव्यांचा वापर बंधनकारक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com