खड्डे बुजवण्या चे काम सुरु  Dainik Gomantak
गोवा

Goa: पोरस्कडे न्हयबाग रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात,वाहनचालक समाधानी

खड्यात रस्ते कि रस्त्यात खड्डे हे वाहनचालकांना समजत नव्हते. या विषयी बातमी प्रसिध्द होताच सार्वजनिक बांधकाम रस्ता विभाग पेडणे यांनी दाखल घेवून खड्डे बुजवण्यास प्रारंभ केलेला आहे.

दैनिक गोमन्तक

मोरजी: पेडणे तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग 66 (National Highway 66 )ला खड्यात रस्ते कि रस्त्यात खड्डे हे वाहनचालकांना समजत नव्हते. ठीक ठिकाणी खड्डे पडून रस्त्याची अक्षरश: चाळण झाली होती. अशाच पद्धतीने अंतर्गत गावागावात जाणारे मुख्य रस्त्ये धोकादायक बनले आहे. त्यात पोरस्कडे न्हयबाग पुलाखाली आणि पत्रकार स्व, दत्ताराम काणेकर यांच्या घराशेजारी मोठमोठे खड्डे पडले होते.

या खड्ड्याविषयी बातमी (news)प्रसिध्द होताच सार्वजनिक बांधकाम रस्ता विभाग पेडणे यांनी दाखल घेवून खड्डे बुजवण्यास प्रारंभ केलेला आहे. त्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

दरम्यान, पेडणे तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या नागरिक आणि वाहनचालकाना(Driver) डोकेदुखी ठरत आहे . दरदिवशी या रस्त्यावर अपघात होतो , नागरिक जखमी होतात , आणि प्रशाशन मात्र आजही सुस्त आहे . मनुष्य बळीसाठी हा राष्ट्रीय महामार्ग आतुरलेला आहे , रस्त्याच्या रुंदीकरणासाठी जी आवश्यक जमीन आहे ती जमीन अजूनपर्यंत संपादित केली नाही ,सरकारच बेकायदा रस्ता करीत असल्याचा दावा करत २६ रोजी मंत्री दीपक पावसकर (Minister Deepak Pawaskar)व उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Babu Azgavkar ) यांना नागरिकांनी जाब विचारला होता त्याचा काहीही अद्यापर्यंत परिणाम झालेला नाही.

तक्रार स्थानिकावर नोंद:

आपल्या समोर या रस्त्यावरील खड्ड्यात पडून नागरिक जखमी होतात, काहीजण मरण पावतात, अश्यावेळी जखमीच्या मदतीला स्थानिक धावून जातात , या रस्त्याच्या कामाविषयी ठेकेदाराला जाब विचारला तर ठेकेदार पोलीस स्टेशनवर (police station)जावून स्थानिक नागरिकांच्या विरोधात तक्रार नोंदवतात , आणि पेडणे पोलीस शहानिशा न करताच गुन्हा नोंदवून त्याला पकडण्यासाठी राजकीय दबाव असल्यामुळे धावपळ करतात , ज्याने लोकहितासाठी ठेकेदाराला जाब विचारला तर गुन्हा आणि आज पर्यंत या रस्त्यावर डझनभर मनुष्य मेले त्याच्या विरोधात गुन्हा नाही

माजी सरपंच सीताराम परब (Sitaram Parab)यांनी याबाबत प्रतिक्रिया संगितले, या रस्त्याचे काम व्यवस्थित होत नसल्याने त्या ठेकेदार कारणीभूत आहे . खड्यात पडून अपघात होतात आणि नागरिकांचा मृत्यू होतो. आता पोलिसांनी ठेकेदारावर आणि रस्त्या अभियात्यावर गुन्हे नोंदवून त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे असे ते म्हणाले .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

SCROLL FOR NEXT