Pilgao farmers protest withdrawal Dainik Gomantak
गोवा

पिळगावमधील शेतकऱ्यांचं आंदोलन अखेर निवळले, दोन दिवसांत करार; सात दिवसांनंतर खनिज वाहतूक झाली सुरू

Pilgao farmers protest withdrawal: तब्बल सात दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पिळगावमधील शेतकऱ्यांचे आंदोलन अखेर निवळले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: तब्बल सात दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पिळगावमधील शेतकऱ्यांचे आंदोलन अखेर निवळले आहे. शेतकऱ्यांनी आंदोलनातून माघार घेतल्याने गुरुवारी खनिज वाहतूक एकदाची सुरू झाली आहे.

वेदांता (सेसा) कंपनी व्यवस्थापनाने प्रमुख मागण्या मान्य केल्याने शेतकऱ्यांनी अखेर आंदोलनातून माघार घेतली आहे. या मागण्या तोंडी स्वरूपात मान्य केल्या असून पुढील दोन दिवसांत लिखित करार होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

नुकसान भरपाई देतानाच कामावरून काढलेल्या कामगारांच्या बाबतीत तूर्त सकारात्मक तोडगा काढण्यात आला आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. खनिज वाहतूक सुरू झाल्याने ट्रकमालकांनीही समाधान व्यक्त केले आहे. तब्बल सात दिवस खनिज वाहतूक बंद राहिल्याने ट्रकमालकही संकटात आले होते.

प्रलंबित प्रश्न सोडवा, अशी मागणी करीत पिळगावमधील शेतकरी गेल्या गुरुवारपासून अचानक रस्त्यावर उतरले होते. शेतकऱ्यांनी सारमानस येथे वेदांता (सेसा) कंपनीच्या फाटकाजवळ रस्ता अडवल्याने खनिज वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता.

आंदोलन मोडून काढण्याचे प्रयत्न असफल

शेतकऱ्यांचे आंदोलन मोडून काढण्यासाठी शासकीय पातळीवरून जोरदार प्रयत्न सुरू होते, मात्र काल बुधवारपर्यंत त्यात यश आले नव्हते. शुक्रवारी आमदारांच्या उपस्थितीत उपजिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये संयुक्त बैठक झाली होती. तसेच उपजिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ind vs NZ: किवींचे 'चक्रव्यूह' टीम इंडियाला भेदता येईल का? टी-20 वर्ल्ड कपमध्ये कोणाचा वरचष्मा? फायनलपूर्वी धक्कादायक आकडे समोर

Goa Budget 2026: आकड्यांचा खेळ की विकासाचा आराखडा? गोव्याच्या अर्थसंकल्पाबद्दल काय आहेत प्रतिक्रिया? वाचा..

Terrorist Attack in Pakistan: हल्लेखोर दुचाकीवरून आला अन् थेट... पाकिस्तानात मोठा दहशतवादी हल्ला; 18 जणांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी

Shigao: सफर गोव्याची! दूधसागर नदीच्या तीरावर वसलेले, सदोदित हिरवाईने नटलेले 'शिगाव'

LPG Cylinder Price Hike: मध्य पूर्वेतील युद्धाची झळ सर्वसामान्यांना! गॅस सिलिंडर 'इतक्या' रुपयांनी महागला! नवे दर आजपासून लागू

SCROLL FOR NEXT