Saligao Petrol Pump Dainik Gomantak
गोवा

Saligao Petrol Pump: काही अंतरावर जाताच गाड्या बंद! साळगावच्या पेट्रोल पंपावर अचानक काय घडलं?

Saligao Petrol Pump Incident: पेट्रोलमध्ये पाणी मिसळल्याने अनेक वाहने बंद पडली. अखेर पेट्रोल पंप मालकावर स्वखर्चाने ती वाहने दुरुस्त करण्याची वेळ आली.

दैनिक गोमन्तक डिजिटल

म्हापसा: पेट्रोलमध्ये पाणी मिसळल्याने अनेक वाहने बंद पडली. अखेर पेट्रोल पंप मालकावर स्वखर्चाने ती वाहने दुरुस्त करण्याची वेळ आली. साळगाव येथे आज हा अजब प्रकार घडला. येथील एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून घेतलेली वाहने काही अंतरावर जाऊन बंद पडू लागली. वाहन मालकांनी शोध घेतल्यावर टाकीत पाण्यावर पेट्रोल तरंगत असल्याचे त्यांना दिसले.

त्यांनी तत्काळ पेट्रोल पंपावर जाब विचारण्यासाठी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी मालकाला पाचारण केले. त्याने ही वाहने दुरुस्त करून देण्याचा मार्ग स्वीकारला. मॅकेनिक आणला गेला आणि वाहने दुरुस्त करून मार्गी लावण्यात आली. ४० वाहनांना याचा फटका बसला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी इंधनाचा नवा साठा भरताना रीतसर तपासणी केली होती. तेव्हा पेट्रोल-डिझेलमध्ये पाण्याचा अंश नव्हता. मात्र, नंतर ग्राहकांच्या तक्रारी आल्या. कदाचित जमिनीखालच्या मुख्य टाकीत खालून पाणी झिरपल्याने हा प्रकार घडला असावा. मालकाच्या त्वरित आणि सकारात्मक प्रतिसादामुळे निर्माण झालेला तणाव निवळला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT