Goa Petrol Diesel Dainik Gomantak
गोवा

Goa Petrol Diesel: चिंता मिटली! पेट्रोल, डिझेलचे जहाज मुरगावात दाखल; पुढील 15 दिवसांचा साठा उपलब्ध

Goa Petrol Diesel : एम.व्ही. सन्मार सितार हे जहाज १८ हजार मेट्रिक टन डिझेल आणि ८ हजार मेट्रिक टन पेट्रोल घेऊन गुरुवारी मुरगाव बंदरात दाखल झाले.

गोमन्तक डिजिटल टीम

Petrol Diesel Availability Goa : पेट्रोल आणि डिझेल टंचाईच्‍या भीतीने गोमंतकीय नागरिक विविध ठिकाणच्‍या पेट्रोल पंपांवर बुधवारपासून रांगा लावत असतानाच, इंधनाची वाहतूक करणारे एम.व्ही. सन्मार सितार हे जहाज १८ हजार मेट्रिक टन डिझेल आणि ८ हजार मेट्रिक टन पेट्रोल घेऊन गुरुवारी मुरगाव बंदरात दाखल झाले. त्‍यामुळे गोव्‍याची पुढील १५ दिवसांची चिंता मिटली आहे.

दुसरीकडे, तुटवड्याच्‍या भीतीने गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशीही नागरिकांनी विविध ठिकाणच्‍या पेट्रोल पंपांवर गर्दी केल्‍याचे दिसून आले. अमेरिका-इस्राईल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्‍या युद्धामुळे गोव्‍यासह देशभरात गेल्‍या काही दिवसांपासून व्‍यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. त्‍यातच बुधवारी पेट्रोल आणि डिझेलचीही पुढील काळात टंचाई जाणवणार असल्‍याची अफवा पसरल्‍यामुळे बुधवारी

पणजीसह राज्‍यभरातील विविध ठिकाणच्‍या पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलसाठी रांगा लागल्‍या. त्‍यामुळे अनेक पंपांवरील पेट्रोल आणि डिझेल सायंकाळीच संपल्‍याने पंप बंद ठेवावे लागले. गुरुवारीही तीच स्‍थिती कायम राहिली.

मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्‍यासह गोवा पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्‍यक्ष नरहर ठाकूर यांनीही पुढील आठ ते दहा दिवस पुरेल इतका पेट्रोल आणि डिझेलचा साठा गोव्‍यात उपलब्‍ध असल्‍याचे आवाहन केले होते. तरीही नागरिकांच्‍या मनातील भीती गेलेली नाही.

इंधनाची साठवणूक करू नका!

राज्‍यात पेट्रोल आणि डिझेलचा अजिबात तुटवडा नाही. त्‍यामुळे नागरिकांनी याबाबतच्‍या अफवांमुळे दिशाभूल करून घेऊ नये. नागरिकांनी बाटल्‍या, ड्रम्‍स किंवा उघड्या भांड्यांमध्‍ये पेट्रोल किंवा डिझेल साठवू नये. त्‍यामुळे आगीचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. ग्राहकांनी केवळ अधिकृत माहितीवरच विश्‍‍वास ठेवावा, असे आवाहन ‘इंडियन ऑईल’ने केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT