

पणजी: पेट्रोल आणि डिझेल टंचाईच्या भीतीमुळे राज्यभरातील नागरिकांनी बुधवारप्रमाणेच गुरुवारीही (26 मार्च) सकाळपासूनच पेट्रोल पंपांवर रांगा लावल्या.
पणजीसह (Panaji) इतर काही भागातील पंपांवरील पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा दुपारपर्यंत सुरळीत राहिला; परंतु दुपारनंतर पंपांवरील पेट्रोल आणि डिझेल संपल्यामुळे संबंधित मालकांनी पंप बंद ठेवल्याचे चित्र दिसून आले. दुसरीकडे, राज्यात इंधनाचा अजिबात तुटवडा नाही, त्यामुळे गोमंतकीय जनतेने घाबरुन पेट्रोल पंपांवर रांगा लावू नयेत, असे आवाहन इंडियन ऑईलने केले.
अमेरिका इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धजन्य स्थितीमुळे गोव्यासह देशभरात गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. त्यातच बुधवारी पेट्रोल आणि डिझेलचीही पुढील काळात टंचाई जाणवणार असल्याची अफवा पसरल्यामुळे बुधवारी पणजीसह राज्यभरातील विविध ठिकाणच्या पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलसाठी रांगा लागल्या. त्यामुळे अनेक पंपांवरील पेट्रोल आणि डिझेल सायंकाळीच संपल्याने पंप मालकांना पंप बंद ठेवावे लागले.
राज्यात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचा अजिबात तुटवडा नाही. त्यामुळे नागरिकांनी याबाबतच्या अफवांमुळे दिशाभूल करुन घेऊ नये. नागरिकांनी पेट्रोल आणि डिझेल साठवू नये. त्यामुळे आगीचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. ग्राहकांनी केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन इंडियन ऑईलने केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.