Mopa Airport
Mopa Airport Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport: मोपा नामकरण बाबतीत आमदारांचे मौन आश्‍चर्यकारक!

दैनिक गोमन्तक

Mopa Airport: मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाला गोव्याचे भाग्यविधाते माजी मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव देण्याची मागणी पेडणे तालुक्यात जोर धरू लागली आहे. मात्र, पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर व मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी याबाबत मौन बाळगल्‍याने आश्‍चर्य व्‍यक्त करण्‍यात येत आहे.

जीत आरोलकर हे मांद्रेतून मगोच्‍या तिकिटावर निवडून आलेले आहेत. तर पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांचाही राजकीय प्रवास याच पक्षातून सुरू झाला आहे. तरीही बांदोडकर यांच्‍या नावाबाबत या दोघांनीही चुप्‍पी साधल्‍याने पेडणे तालुक्‍यातील भाऊप्रेमी आणि मगोप्रेमी अस्‍वस्‍थ झालेले आहेत.

मोपा विमानतळाला गोव्याचे भाग्यविधाते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव योग्य असून सरकारने हे नाव देऊन भाऊसाहेबांप्रति आदर व्यक्त करावा, अशी मागणी पेडणे तालुक्यातून होत आहे.

अन्य कोणाशी तुलना नको! उमेश तळवणेकर, बहुजन समाज अध्यक्ष-

राज्यासाठी गोवा मुक्तीनंतर जे भाऊसाहेब बांदोडकरांनी कार्य केले त्याला तोड नाही. त्यांनी बहुजन समाजहित जोपासले. भाऊसाहेबांचेच नाव मोपा विमानतळाला द्यावे. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे नाव विमानतळाला देण्याचे षड्‌यंत्र भाजप करत आहे. पेडणेसाठी पर्रीकरांचे कोणते योगदान होते, हे भाजपने सांगावे.

भाऊसाहेबांचेच नाव योग्य; श्रीधर मांजरेकर, मोगोचे ज्येष्ठ कार्यकर्ते-

भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाला योग्य असून त्यांनी गोव्यासाठी दिलेले योगदान हे कोणी विसरू शकत नाही. भाऊसाहेबांनी गोवा मुक्तीनंतर विविध क्षेत्रात क्रांतिकारक निर्णय घेऊन या राज्याचा विकास होण्यासाठी उचललेले पाऊल हे खूप मोठे असून त्यांच्या एकूण कार्याची दखल घेऊन मोपा विमानतळाला त्यांचेच नाव सरकारने द्यावे.

राज्याची प्रगती बांदोडकरांमुळेच; दयानंद मांद्रेकर, मोगोचे ज्येष्ठ कार्यकर्ते-

भाऊसाहेबांनी गोवा मुक्तीनंतर विविध क्षेत्रात केलेले कार्य उल्लेखनीय आहे. त्यामुळे आज गोव्याची ओळख संपूर्ण देशात आणि जगात झाली आहे. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव गोवा सरकारने आणि केंद्र सरकारने द्यावे.

अन्यायाला वाचा फोडणारा नेता; सुबोध महाले, सरपंच, तांबोसे-मोपा-उगवे

भाऊसाहेबांनी गोव्याच्या बहुजन समाजासाठी तसेच कुळांसाठी कूळ-मुंडकार कायदा आणून त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली होती. आणि त्यामुळे शेतकरी आणि कष्टकरी वर्गाला हक्क मिळाला. त्यामुळे मोपा या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भाऊसाहेबांचेच नाव योग्य आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tristate Meet: गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक पहिल्यांदाच समन्वय बैठक का घेतायेत? कोणत्या विषयावर होणार चर्चा

ED Goa: गोव्यातील विपुल शिपयार्ड कंपनीवर ईडीचा छापा, 12.20 कोटींची मालमत्ता जप्त

SBI FD Interest Rates: एसबीआयच्या करोडो ग्राहकांचे बल्ले-बल्ले, आजपासून नवीन व्याजदर लागू; जाणून घ्या कोणाला मिळणार लाभ?

Goa Indore Flight: खराब हवामानाचा फटका! एक तास हवेत घिरट्या घालत होतं विमान; प्रवाशांचा जीव टांगणीला

India Iran Chabahar Deal: भारत आणि इराण यांच्यातील करारावर महासत्ता ‘खफा’; जाणून भारतासाठी चाबहार बंदर का महत्त्वाचं आहे?

SCROLL FOR NEXT