Goa Mega Job Fair: गोव्यात 8 नोव्हेंबर रोजी मेगा जॉब फेयरचे आयोजन

रोजगार मंत्री बाबुश मोन्सेरात यांची माहिती; विविध रोजगार संधींचा खजिना होणार खुला
Babush Monserrate
Babush MonserrateDainik Gomantak

Goa Mega Job Fair: गोव्यात 8 नोव्हेंबर रोजी मेगा जॉब फेयरचे (Goa Mega Job Fair) आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे कामगार आणि रोजगार मंत्री बाबुश मोन्सेरात (Babush Monserrate) यांनी ही माहिती दिली.

Babush Monserrate
Goa Municipality: मडगावातील धोकादायक इमारती पाडा- ज्योती कुमारी

मंत्री बाबुश मोन्सेरात यांचा याबाबतचा व्हिडिओ गोव्याच्या माहिती आणि प्रसिद्धी विभागाने ट्विट केला आहे. त्यामध्ये मंत्री मोन्सेरात यांनी म्हटले आहे की, राज्याच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाने या मेगा जॉब फेयरचे आयोजन केले आहे. नोकरी देणारे आणि नोकरी हवी असलेले यांना एकाच व्यासपीठवर आणण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. देशभरासह परदेशातीलह विविध क्षेत्रातील रोजगार संधींचा खजिना येथे उपलब्ध होणार आहे. सर्व इच्छुकांना या मेगा जॉब फेयरचा लाभ घ्यावा.

Babush Monserrate
Dabolim Airport to Shut or Not : मोपा सुरु झाल्यास दाबोळीचं विमानतळ बंद होणार का? केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत हा जॉब फेयर होईल. या जॉब फेयरमध्ये नोंदणीसाठी goajobfair.in या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन मंत्री मोन्सेरात यांनी केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com