Goa | Subhash Phaldesai Dainik Gomantak
गोवा

Goa News: दस्तावेज संवर्धनासाठी डिजिटलायझेशन गरजेचे- सुभाष फळदेसाई

Goa News: दस्तावेजांचे डिजिटलायझेशन झाले असते, तर गेल्या काही वर्षांत झालेली अफरातफर झालीच नसती.

दैनिक गोमन्तक

Goa News: जर यापूर्वी पुराभिलेख दस्तावेजांचे डिजिटलायझेशन झाले असते तर गेल्या काही वर्षांत झालेली अफरातफर झालीच नसती. दस्तावेजांच्या संवर्धनासाठी त्यांचे डिजिटलायझेशन होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पुरातत्व व पुराभिलेख खात्‍याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी केले.

पेडणे येथील संत सोहिरोबानाथ कला आणि वाणिज्य महाविद्यालय तसेच पुराभिलेख विभाग यांच्‍या संयुक्त विद्यमाने पाटो-पणजी येथील संस्कृती भवनात आयोजित गोव्यातील ऐतिहासिक पुराभिलेखांवर राष्ट्रीय परिसंवादाच्या उद्‌घाटनसमयी फळदेसाई बोलत होते.

व्यासपीठावर महाराष्ट्राच्या पुरातत्व व संग्रहालय संचालनाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्राध्यापक मंजिरी भालेराव, प्राचार्य आर. डिमेलो, पुराभिलेख अधिकारी बालाजी शेणवी व इतर मान्यवर उपस्थित होते. बालाजी शेणवी यांनी आभार मानले.

सुभाष फळदेसाई, पुरातत्व व पुराभिलेख खात्‍याचे मंत्री-

पुराभिलेख विभागात जे दस्तावेज आहेत, त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणालाही ते पाहण्यास देता कामा नयेत. जर एखाद्याला ते पाहायचे असतील तर त्याचा हेतू काय आहे हे जाणून घेतले पाहिजे. दस्‍तावेजांचे डिजिटलायझेशन झाल्यास ते अधिक सोयीस्कर ठरेल. संशोधक आणि अभ्यासकांसाठी देखील ते महत्त्वाचे ठरेल.

डॉ. तेजस गर्गे, महाराष्ट्र पुरातत्व व संग्रहालय संचालक-

गोव्यात पहिल्यांदा कातळशिल्पे (प्रस्तरशिल्पे) संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केले. त्‍यामुळे गोवा सरकार अभिनंदनास पात्र ठरते. ही शिल्‍पे अजंठा गुहांपेक्षा पुरातन आहेत. महाराष्ट्रातील आठ आणि गोव्यातील एक अशा एकूण नऊ कातळशिल्पांच्‍या जागतिक वारसास्थळ मानांकनासाठी महाराष्ट्र व गोव्याने एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT