Goa River: सासष्टीची जीवनदायिनी 'साळ नदी' होतेय दूषित

Goa River: राजकारणी आणि सरकारी अधिकाऱ्यांतर्फे घोषणा दिल्या जातात; पण प्रत्यक्षात अजूनही साळ नदीचे पाणी स्वच्छ होत नाही.
Goa Sal River
Goa Sal RiverDainik Gomantak
Published on
Updated on

Goa River: साळ नदी ही सासष्टी तालुक्याची जीवनदायिनी आहे, असे मानतात. पण हीच साळ नदी घाणेरडी होत चालली आहे. कित्येक वर्षांपासून नदी स्वच्छ करणार, स्वच्छ करणार अशा घोषणा राजकारणी व सरकारी अधिकाऱ्यांतर्फे दिल्या जातात; पण प्रत्यक्षात अजूनही साळ नदीचे पाणी स्वच्छ होत नाही.

नदीच्या सभोवतालची शेतजमीन खराब होत चालली आहे व जे लोक त्या परिसरात राहातात त्यांना आरोग्याच्या तक्रारी आहेतच. काही दिवसांपूर्वी जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी या भागाला भेट देऊन साळ नदीमध्ये जिकडून काेठून सांडपाणी सोडले जाते ते सर्व स्त्रोत बंद करणार, अशी घोषणा केली होती. मात्र, अजूनही त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना दिसत नाही.

Goa Sal River
Goa Government: मोरजी अन् मांद्रे किनारे कमर्शियल झोन!

मडगावातील वेगवेगळ्या भागांतून विविध मार्गाने सांडपाणी, निचऱ्याचे पाणी साळ नदीमध्ये सोडण्याची प्रक्रिया अजूनही तशीच आहे. मलनिस्सारण खात्यातील कंत्राटदारांकडून जे निकृष्ट काम केले जाते ते शॅडो कौन्सिलतर्फे वारंवार दाखवून दिले जात आहे.

संबंधित अधिकारिणी सायपेम तळीबद्दलच्या प्रदूषणाची दिशाभूल करणारी माहिती उच्च न्यायालयाला सादर करतात. काही औद्योगिक आस्थापनांना, निवासी इमारती, सोसायट्यांना ते खरेच सांडपाणी नेटवर्कला जोडले गेले आहेत की नाहीत याची पडताळणी न करताच अधिकारी नोटीसा बजावत असल्याचा आरोपही कुतिन्हो यांनी केला.

Goa Sal River
Goan News: तोतया पर्यटक गाईडकडून फसवणूक; पर्यटन खात्याची चालढकल!

येथून येते सांडपाणी

नावेली येथील कुडचडकर हॉस्पिटलजवळील नाल्यातून सांडपाणी प्रथम सायपेम तळी व नंतर साळ नदीमध्ये सोडले जाते, असे दिसून आले आहे. काही लोकांनी निदर्शनास आणून दिले आहे की दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाजवळ असलेल्या नाल्यातूनही हे पाणी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी इमारतीच्या जवळ असलेल्या नाल्यात सोडले जाते व तिथून साळ नदीमध्ये ही घाण जात आहे.

सावियो कुतिन्हो, शॅडो कौन्सिलचे निमंत्रक-

पुढील दशकापर्यंत मडगावमधील जलस्रोत प्रदूषण समस्या कोणीही सोडवू शकेल असे वाटत नाही. संबंधित अधिकारिणीला यासाठी अजून 15 वर्षांची मुदत दिली तरी ती कमीच आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com