Goa real estate Q1 2025 Dainik Gomantak
गोवा

Goa Housing Market: गोव्यात घरांची किंमत वाढली, समाधानकारक कामगिरी; विक्रीमूल्यात 17 टक्के वाढ

Goa Real Estate: देशातील प्रमुख १५ टियर-२ शहरांमध्ये यंदाच्या पहिल्या तिमाहीत घरविक्रीत एकूण ८ टक्के घट झाली असतानाही गोवा राज्याने तुलनेत चांगली कामगिरी केली आहे.

Sameer Panditrao

पणजी: देशातील प्रमुख १५ टियर-२ शहरांमध्ये यंदाच्या पहिल्या तिमाहीत घरविक्रीत एकूण ८ टक्के घट झाली असतानाही गोवा राज्याने तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. गोव्यात घरविक्रीच्या संख्येत केवळ १ टक्के घट झाली असली तरी विक्रीमूल्यात १७ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

ही माहिती ‘प्रॉपइक्विटी’ या रिअल इस्टेट डेटा अ‍ॅनालिटिक्स संस्थेच्या ताज्या अहवालात देण्यात आली आहे. अहवालात दिलेल्या माहितीनुसार २०२५च्या पहिल्या तिमाहीत देशातील टियर-२ शहरांमध्ये एकूण ४३,७८१ युनिट्सची विक्री झाली, जी २०२४च्या याच कालावधीत झालेल्या ४७,३७८ युनिट्सच्या विक्रीपेक्षा ८ टक्के कमी आहे. मात्र, याच कालावधीत विक्रीचे मूल्य ६ टक्के वाढून ४०,४४३ कोटी रुपयांवर पोहोचले, जे २०२४ मध्ये ३८,१०२ कोटी रुपये होते.

युनिट विक्रीत ६ शहरांचा २५ टक्के वाटा

गोव्यात घरविक्रीच्या युनिट्समध्ये केवळ १ टक्के घट झाली असली, तरी एकूण विक्रीमूल्यात १७ टक्के वाढ झाली आहे. ही वाढ प्रॉपर्टीच्या दरवाढीमुळे किंवा ग्राहकांचा कल प्रीमियम प्रकल्पांकडे वळल्यामुळे झाली असण्याची शक्यता आहे. प्रॉपइक्विटीच्या अहवालानुसार, गोवा, लखनौ, गांधीनगर, जयपूर, भोपाळ आणि भुवनेश्‍‍वर या सहा शहरांनी एकत्रितपणे एकूण युनिट विक्रीत २५ टक्के वाटा आणि विक्रीमूल्यात ३० टक्के हिस्सा नोंदवला.

पश्‍मिच भारतासह या शहरांत वाढ

पश्‍मिच भारतातील अहमदाबाद, सूरत, वडोदरा, गांधीनगर, नाशिक, नागपूर आणि गोवा या शहरांमध्ये एकूण युनिट विक्रीत ६ टक्के घट झाली, मात्र विक्रीमूल्यात ६ टक्के वाढ झाली आहे. गोव्यातील १७ टक्के वाढ ही या सकारात्मक कलाचा एक भाग मानली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: झाड पडलेल्या घराची वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT