Arshad Warsi Goa Home: पॉश, अलिशान, रॉयल! पाहताच क्षणी प्रेमात पडावं असं अर्शद वारसीचं गोव्यातील पोर्तुगीज घर, पाहा Video

Inside Arshad Warsi’s Goa home Video: अर्शदच्या घरातील रंगकाम, बैठक व्यवस्था, बेडरुम, डायनिंग रुम, रिडिंग रुम, बाल्कनी, पुस्तकांची शेल्फ, स्विमिंग पूल, गार्डन या सर्वांची अतिशय उत्तम पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे.
Arshad Warsi Goa Home: पॉश, अलिशान, रॉयल! पाहताच क्षणी प्रेमात पडावं असं अर्शद वारसीचं गोव्यातील पोर्तुगीज घर, पाहा Video
Arshad Warsi Goa HomeDainik Gomantak
Published on
Updated on

Inside Arshad Warsi’s Goa home Video

साळगाव: आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेता अर्शद वारसीच्या गोव्यातील घराची झलक समोर आली आहे. अर्शदने गोव्यात पोर्तुगीज बनावटीचे घर खरेदी केले असून, तो आणि त्याची पत्नी मारियाने घराला स्वप्नातील महल केला आहे. अर्शद आणि मारिया यांचे घर पाहताच क्षणी प्रेमात पडावे असे आहे.

Arshad Warsi Goa Home
Arshad Warsi Goa HomeAsian Paints/YouTube

अर्शदने गोव्यातील साळगाव येथे पोर्तुगीज बनावटीचे घर खरेदी केले. घराचे रंगकाम, आरास आणि सजावटीचे काम आता पूर्ण झाले आहे. अर्शद - मारियाच्या या स्वप्नातील घराचा पहिला वहिला व्हिडिओ आता समोर आला आहे. एशियन पेंट्स या कंपनीने अर्शदच्या घराचा व्हिडिओ शूट केला आहे. यात अर्शदने घरातील कोपरा न कोपरा कसा सजावलाय याची झलक दिलीय.

Arshad Warsi Goa Home: पॉश, अलिशान, रॉयल! पाहताच क्षणी प्रेमात पडावं असं अर्शद वारसीचं गोव्यातील पोर्तुगीज घर, पाहा Video
'गोव्यात घर घ्यायची इच्छा होती पण खिशात पैसे नव्हते', अर्शद वारसीने खरेदी केले पोर्तुगीज बनावटीचे घर
Arshad Warsi Goa Home
Arshad Warsi Goa HomeAsian Paints/YouTube

अर्शद - मारिया यांनी अतिशय कलात्मक पद्धतीने घराची रचना केलीय. घरातील रंगकाम, बैठक व्यवस्था, बेडरुम, डायनिंग रुम, रिडिंग रुम, बाल्कनी, पुस्तकांची शेल्फ, स्विमिंग पूल, गार्डन या सर्वांची अतिशय उत्तम पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे. घरात करण्यात आलेल्या रंगकामाची विशेष माहिती देताना अर्शद या व्हिडिओत दिसत आहे.

Arshad Warsi Goa Home
Arshad Warsi Goa HomeAsian Paints/YouTube

घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी अर्शद -मारियाने विशेष काळजी घेतलीय. घरात लावण्यात आलेले लाईट्स, खिडक्या, घरात पुरेसा प्रकाश येईल यासाठी प्रयत्न केला आहे. घराच्या सजावटीचे श्रेय अर्शद पत्नी मारियाला देतो. गोव्याशी फार जुना संबंध असल्याचे अर्शद सांगतो. गेल्या ३०-३५ वर्षापासून गोव्याशी जवळचा संबंध असल्याचे अर्शदने व्हिडिओत म्हटले आहे.

Arshad Warsi Goa Home: पॉश, अलिशान, रॉयल! पाहताच क्षणी प्रेमात पडावं असं अर्शद वारसीचं गोव्यातील पोर्तुगीज घर, पाहा Video
कोणाचा व्हिला तर कोणाचे पोर्तुगीज स्टाईल घर; गोव्यात अलिशान घर असणारे बॉलिवूड स्टार्स आणि क्रिकेटर

अर्शद वारसीचे गोव्यातील घर पाहण्यासाठी खाली क्लिक करा (Arshad Warsi's Home In Goa Video)

गोव्यात घर घेण्याची माझी नेहमीच इच्छा होती पण, खिशात तेवढे पैसे नव्हते. अभिनयात चांगले पैसे मिळत गेले आणि गोव्यात घर घेण्याची इच्छा पूर्ण झाली. गोवा किंवा कोकणातील लोकांबाबत मनात विशेष जिव्हाळा असल्याचे अर्शदने एका मुलाखतीत म्हटले होते.

पेशाने अभिनेता असलेल्या अर्शदने गोव्यातील घर अतिशय साधं तरीही आकर्षक ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे घरातील प्रत्येक कोपऱ्यात आणि भिंतीवर आकर्षक चित्रं, शोभेच्या वस्तू, पेटिंग पाहायला मिळतील. अर्शदचे घर सध्या सर्वांच्याच पसंतीस पडत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com