Bicholim Goa | pepper spray  Dainik Gomantak
गोवा

Pepper Spray Case: पेपर स्प्रे प्रकरणात शिक्षण खात्याकडून हात वर

कारवाईची जबाबदारी शाळेवर

दैनिक गोमन्तक

डिचोली येथील उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना अत्यवस्थ केल्याप्रकरणातील संशयित विद्यार्थ्यांवरील कारवाई मागे घेण्याचा आदेश बाल हक्क आयोगाने दिला असला तरी त्यावर कोणताही निर्णय घेणे शिक्षण खात्याने टाळले आहे.

शिक्षण खात्याने तो आदेश संबंधित विद्यालय प्रमुखांना पाठवून त्यावरील त्यांचे म्हणणे जाणून घेण्याचा मध्यम मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने या प्रकरणात हात वर केल्याचे स्पष्ट होत आहे.

विद्यालयाने पेपर स्प्रे प्रकरणी ‘त्या’ विद्यार्थ्यांना महिनाभरासाठी निलंबित करण्याची कारवाई केली आहे. पोलिसांनी आणि शिक्षण खात्याने विद्यालयाच्या व्यवस्थापनास चौकशी करून उचित कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र, निलंबनाची कारवाई ही अयोग्य व कडक असल्याचा सूर व्यक्त करत बाल हक्क आयोगाने ही कारवाई त्वरित मागे घ्यावी, असे खात्याला कळविले.

"आयोगाचे पत्र आजच मिळाले आहे. विद्यार्थ्यांवर कारवाई ही शाळा व्यवस्थापनाच्या पातळीवर करण्यात आली आहे. शिक्षण खात्याने त्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही."

"त्यामुळे आयोगाचा आदेश शाळा व्यवस्थापनाकडे त्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी पाठवण्यात येणार आहे. अखेर निर्णय शाळा व्यवस्थापनाच्या पातळीवरच घ्यावा लागणार आहे."

- शैलेश झिंगडे, शिक्षण संचालक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Hazare Trophy: मुंबईचा विजयी चौकार; गोवा संघाचा 87 धावांनी पराभव, अभिनव तेजराणाची शतकी खेळी व्यर्थ

'कुशावती' सुशासनाची तहान भागवेल? - संपादकीय

Goa GI Tag: गोव्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 5 नवीन उत्पादनांना मिळाले 'GI' मानांक; कृषी समृद्धीचा जागतिक गौरव

Pillion Helmet Rule: आता मागे बसणाऱ्यालाही हेल्मेट सक्ती, रस्ते सुरक्षेसाठी मोठा निर्णय! टप्प्याटप्प्याने होणार अंमलबजावणी

Cooch Behar Trophy: गोव्याला मध्य प्रदेशकडून कठीण आव्हान अपेक्षित, उपांत्यपूर्व लढतीत लागणार कस

SCROLL FOR NEXT